खासगी रुग्‍णालयांमध्ये कोविड बाधितांवर उपचार नाही

hospital
hospitalesakal

नाशिक : कोविड रुग्‍णालयाची (covid hospital) सेवा बंद करीत असल्‍याचे हॉस्‍पिटल ओनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांना कळविले आहे. या संदर्भात मंगळवारी (ता. १) असोसिएशनच्‍या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. तसेच बुधवार (ता. २)पासून खासगी रुग्‍णालयात कोरोनाबाधित दाखल करून न घेण्याचा निर्णय बैठकीत झाल्‍याचे सूत्रांकडून समजते. (no-treatment-for-covid-infections-in-private- hospitals)

मुख्यमंत्र्यांना पत्र; हॉस्‍पिटल ओनर्स असोसिएशनचा निर्णय

बुधवारपासून रुग्‍ण दाखल न करण्याचा निर्णय संघटनेच्‍या बैठकीत झाला असला, तरी पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली नाही. मुख्यमंत्र्यांसमवेत आरोग्‍यमंत्री, पालकमंत्री व स्‍थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही पत्राची प्रत पाठविली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे, की गेल्‍या दीड वर्षापासून कोविड-१९ आजाराच्‍या साथीला आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्‍नशील आहोत. शासनाच्‍या सर्व सूचनांचे पालन करत नाशिकमधील खासगी रुग्‍णालयात रुग्‍णसेवा दिली. मृत्‍युदर कमी राखण्यात आणि रुग्‍ण बरे होण्यात योगदान दिले. मात्र, रुग्‍णालयांच्‍या काही समस्‍या आहेत. त्‍यामुळे रुग्‍णालयचालक व रुग्‍णालयातील कर्मचारी वर्ग आता मानसिक व शारीरिक दोन्‍ही दृष्टीने थकले आहेत. तसेच आता कोविड रुग्‍णसंख्या कमी झाली आहे. तेवढे रुग्‍ण सांभाळणे शासकीय आणि निमशासकीय यंत्रणांना सहज शक्‍य आहे. तेथेही तेवढ्याच दर्जेदार सुविधा आहेत. त्‍यामुळे आम्‍ही सर्व खासगी कोविड रुग्‍णालये आता बंद करीत आहोत. भविष्यात पुन्‍हा गरज पडली, तर आम्‍ही सर्व जण सेवा देऊ, असे म्‍हणताना या जबाबदारीतून कार्यमुक्‍त करण्याची विनंती पत्रात केली आहे.

दीडशेहून अधिक स्‍वाक्षऱ्या

कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेत ९० खासगी कोविड रुग्‍णालये होती. दुसऱ्या लाटेत ही संख्या १८८ वर पोचली होती. यातील दीडशेहून अधिक रुग्‍णालयांच्‍या प्रमुखांनी निवेदनासोबत स्‍वाक्षरी करत संघटनेच्‍या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

hospital
अवघ्या चोवीस तासांत आईपाठोपाठ मुलाचाही मृत्यू

प्रशासकीय, सामाजिक मनस्‍तापामुळे निर्णय

रुग्‍णसंख्या कमी झालेली असताना लेखापरीक्षण, चौकशी, नोटिसा असे प्रशासकीय पातळीवरून दबावतंत्र अवलंबले जात आहे. सामाजिक स्‍तरावर काही व्‍यक्‍तींकडून विविध समाज माध्यमांवर रुग्‍णालयाची बदनामी केली जात असल्‍याची खंत असोसिएशनच्‍या पदाधिकाऱ्यांनी खासगीत व्‍यक्‍त केली. या मनस्‍तापाला कंटाळून कोविड रुग्‍णालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्‍याचे सांगण्यात आले.

hospital
सरकारने जखमेवर मीठ चोळले; EWS घोषणेवर नाशिकमध्ये तिखट प्रतिक्रिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com