Nashik News : पैसेच खायचे तर या घ्या नोटा... निवडणूक अधिकाऱ्यावर उधळल्या नोटा

Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news
Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik newsesakal

Nashik News : जिल्ह्यातील बहुचर्चित अशा नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आज वेगळ्याच कारणांनी गाजली.

बॅंकेतील विरोधी परिवर्तन व्यापारी पॅनलच्या उमेदवारांनी निवडणुकीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत, निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या केबिनमध्ये नोटा उधळून तसेच उमेदवारी अर्ज माघार घेत निषेध केला. (Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news)

दरम्यान याप्रकरणी सदोष निवडणूक प्रक्रिया राबविल्याबद्दल व्यापारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे श्री. बलसाने यांनी सांगितले.

नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरु होती. २१ जागांसाठी निवडणुकीत शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निवृत्ती अरिंगळे यांच्या सत्तारूढ श्री सहकार आणि तर माजी नगरसेवक अशोक सातभाई आणि हेमंत गायकवाड यांच्या विरोधी परिवर्तन पॅनलमध्ये चुरस होती.

उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बुधवारी (ता.३१) तब्बल ५६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यावरुन सत्तारूढ पॅनल आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगले. यात सत्तारूढ गटाला निवडणूक यंत्रणेची साथ असल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news
SSC Result 2023 : राज्यात दहावीचा निकाल आज दुपारी 1ला; या संकेतस्थळावर विषयनिहाय गुणांची माहिती मिळणार

पोटनियम दुरुस्ती हे मूळ

नाशिक रोड देवळाली व्यापारी बॅंक जिल्ह्यातील अव्वल स्थानावरील बॅंक आहे. ७० हजाराहून अधिक सभासद असलेल्या या बॅंकेत सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भरणा असल्याने दरवेळी एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील चुरशीप्रमाणे यात चुरस असते.

अनेक नवखे हौशी कार्यकर्तेही यात सहभागी होत असल्याने काही महिन्यांपूर्वी बॅंकेच्या संचालक मंडळाने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या सभासदांना किमान दोन लाख रुपयांच्या ठेवी बॅंकेत असल्या पाहिजे.

तसेच निवडणूक लढवू इच्छिणारा सभासद सक्रिय सभासद असावा, असा नियम करून पोटनियम दुरुस्ती केली होती. त्याला तत्कालीन विद्यमान संचालक अशोक सातभाई यांच्यासह काहींचा विरोध होता. सहकार विभागाकडेही या विरोधात कागदी लढाई रंगली होती. न्यायालयात हा वाद पोचला.

Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news
Nashik News : उद्योगमंत्र्यांच्या पत्रानंतर उद्योजकांचा बंद मागे; एकजूटतेबाबतचा संभ्रम दूर

५६ अर्ज बाद त्यात एक चूक

उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान याच इच्छुकांच्या बॅंकेत ठेवी नसल्याच्या मुद्यावरुन ५६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यात विरोधी पॅनलच्या बहुतांश इच्छुकांचे अर्ज असल्याने विरोधी गटाचे उमेदवार संतापले. या संतापात माजी नगरसेविका व विरोधी पॅनलच्या नेत्यांच्या पत्नी संगीता गायकवाड यांचाही अर्ज बाद ठरविला.

वास्तविक संगीता गायकवाड यांचे बॅंकेत ठेवी असल्याने पोटनियम दुरुस्तीनंतरच्या नियमानंतरही त्या पात्र ठरत असताना त्यांचा अर्ज अवैध ठरविला गेल्याने नेमकी ही चूक विरोधी गटाला संधी देणारी ठरली.

पोटनियम दुरुस्तीनुसार इच्छुकांच्या बॅंकेत ठेवी असताना श्रीमती गायकवाड यांचा अर्ज बाद कसा? हा मुद्दा उपस्थित करीत विरोधी गटाने हरकत घेतली. त्यांच्या हरकतीत तथ्य असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम यांच्याकडे खुलासा मागविला.

Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news
ZP Staff Transfer : अखेर मुख्यालयातील कर्मचाऱ्यांचे टेबल बदलणार! 38 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

अन्‌ नोटा उधळल्या

आधीच ५६ उमेदवारांत बहुतांश इच्छुकांचे अर्ज बाद झाल्याने हतबल झालेल्या विरोधी गटाच्या पदाधिकाऱ्यांना सदोष कामकाजाचा आरोप करण्याची संधी या निमित्ताने मिळाली. विरोधी गटाच्या इच्छुकांनी निवडणूक निर्णय अधिकारी गौतम बलसाने यांच्या केबिनमध्ये जमून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

चोर... चोर... है अशा घोषणा देत, आर्थिक गैरव्यवहार करीत सदोष कामकाज पद्धती राबविल्याचा आरोप करीत त्यांच्यावर चक्क नोटा उधळल्या. पैसेच खायचे तर या घ्या नोटा असे म्हणत विरोधी गटाचे श्याम गोहाड, हेमंत गायकवाड आदींसह संतप्त इच्छुकांनी नोटा उधळीत सदोष कामकाजाचा निषेध केला.

मुख्याधिकारी बडतर्फ

निवडणुकीत प्रक्रियेसाठी सदोष माहिती पुरविली. संगीता गायकवाड यांच्या ठेवी असतानाही त्यांची माहिती दडवून ठेवीत सदोष प्रक्रिया राबविल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सहकार विभागाकडून पाठविला जाणार आहे.

Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news
Diploma Course Admission : डिप्‍लोमा प्रवेश नोंदणीची या तारखेपर्यंत मुदत; जाणुन घ्या प्रवेश वेळापत्रक..

"उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच निवडणुकीची प्रक्रिया राबविली गेली आहे. त्यानुसार ५६ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहे. मात्र याच दरम्यान बॅंकेकडून संगीता गायकवाड यांच्याविषयी चुकीच्या माहितीवर अर्ज ठरविला गेला. त्यानंतर पुन्हा त्यांचा सुधारित पत्र दिले गेले. या सगळ्या प्रकारात मुख्य कार्यकारी अधिकारी एकनाथ कदम यांनी सदोष प्रक्रिया राबविल्याने त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे." - गौतम बलसाने, निवडणूक निर्णय अधिकारी

"निवडणूक प्रक्रिया सदोष पद्धतीने राबविली गेली. संगीता गायकवाड यांचा अर्ज बाद केला गेला हा त्याचा पुरावा आहे. भ्रष्ट मार्गानेच निवडणूक जिंकायची सत्तारूढ गटाचे नियोजन आणि त्याला सहकार विभागाची साथ बघता निवडणूक न लढणेच योग्य होते. त्यामुळे स्पर्धेत असलेल्या आम्ही उमेदवारांनी अर्ज माघार घेत, या भ्रष्ट निवडणूक पद्धतीचा निषेध केला आहे." - अशोक सातभाई, परिवर्तन पॅनल

"नाशिक रोड व्यापारी बॅंक उत्तर महाराष्ट्रातील नामांकित बॅंक आहे. व्यापारी, कामगार, शेतकरी अशा सर्व घटकांतील ठेवीदार, खातेदारांच्या विश्वासांच्या जोरावर आर्थिक सक्षमपणे बॅंकेची वाटचाल सुरु आहे. बिनविरोध निवडणूक झाल्याने बॅंकेच्या ७० ते ८० लाखाचा खर्च वाचणार आहे. बॅंकेच्या सभासदांच्या विश्वासाचा विजय आहे." - निवृत्ती अरिंगळे, सहकार पॅनल

Notes thrown on Election Officer Election of Board of Directors of Nashik Road Deolali Trade Co operative Bank nashik news
Nashik: 'त्या' मृतदेहांचा संशयितांच्या घरामोर अंत्यविधी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल, ग्रामस्थ संतप्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com