Nashik: नाशिक उपकेंद्रासाठी आता सहायक कुलसचिव; पुणे विद्यापीठातर्फे BBA अभ्यासक्रमाची होणार सुरवात

Pune University
Pune UniversitySakal

Nashik : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी सहायक कुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. विद्यापीठाच्या नाशिक आणि नगर कॅम्पससाठी आवश्यक मनुष्यबळाचा विस्तृत प्रस्ताव शासनाला पाठवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे.

तसेच नाशिक उपकेंद्रात लवकरच बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. (Now Assistant Registrar for Nashik sub centre Pune University will start BBA course Nashik news)

पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषेद सदस्य आणि नाशिक उपकेंद्र विकास समन्वय समितीचे निमंत्रक सागर वैद्य यांनी हे प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केले होते. या विषयांना विद्यापीठाकडून मंजुरी मिळाली आहे.

नाशिक उपकेंद्रात लवकरच बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. हा अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. ॲकॅडमिक काऊंन्सिलसह संबंधित विभागांकडून आवश्‍यक प्रक्रिया पार पाडून लवकरच नाशिक उपकेंद्रात ३ वर्ष कालावधी असलेला बीबीए अभ्यासक्रम सुरू होईल.

विविध कामांसाठी जिल्ह्यातील सुमारे दोनशेहून अधिक महाविद्यालये आणि हजारो विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठ गाठावे लागते. उपकेंद्र सक्षमीकरण करतांना काही पदांची भरती नाशिक उपकेंद्रात केल्यास नाशिककरांची ही परवड थांबेल आणि वेळ, श्रम, पैशाची बचत होणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pune University
Farmer Protest : ‘शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण...! शेतकऱ्यांचा रास्तारोको

सहायक कुलसचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणुकीतून सुमारे चाळीस टक्‍के काम नाशिकमधून होऊ शकेल, असा प्रस्ताव सागर वैद्य यांनी मांडला होता. त्यामुळे या पदाला तत्काळ मंजुरी दिली. पदभरतीची प्रक्रिया विद्यापीठ सुरू करत असल्‍याचे यावेळी सांगण्यात आले.

भविष्यात नाशिक कॅम्पस अधिक सक्षम करण्यासाठी मनुष्यबळ आवश्यक आहे. सदर मनुष्यबळ भरतीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यासाठी एक विशेष समिती गठित करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या समितीत सागर वैद्य यांच्यासह व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र विखे-पाटील, संदीप पालवे, विद्यापीठाच्या अधिकारी वैशाली साकोरे यांचा समावेश आहे.

‘पुम्‍बा’ च्या मॅनेजमेन्ट अभ्यासक्रमांना मागणी आहे. एमबीए पाठोपाठ आता बीबीएचा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाने सुरू करावा, ही मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती.

Pune University
Success Story : 4 महिन्यांच्या मुलीपासून दूर राहणाऱ्या 'हिरकणी'चे स्वप्न झाले पूर्ण; दीपालीची गगनभरारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com