नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाख पार

कोरोना रुग्णसंख्येने मंगळवारी शहरात दोन लाखांचा आकडा पार केला.
 Corona Updates
Corona Updates


नाशिक : कोरोना रुग्णसंख्येने मंगळवारी (ता. ४) शहरात दोन लाखांचा आकडा पार केला. शहरात दोन हजार २९१ कोरोनाबाधित आढळल्याने १३ महिन्यांत दोन लाख १५३ रुग्णसंख्या झाली. मागील वर्षी ६ एप्रिलला शहरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण गोविंदनगर भागात आढळला होता. त्यानंतर रुग्णसंख्येमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली.

सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० हे दोन महिने गेल्या वर्षी कोरोनाबाधितांची सर्वाधिक आकडेवारी ठरविणारे महिने ठरले. ऑक्टोबरनंतर कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला. डिसेंबर २०२० पर्यंत परिस्थिती पूर्वपदावर आली. जानेवारीत तर कोरोना संसर्ग आहे की नाही, अशी परिस्थिती होती. फेब्रुवारी २०२१ अखेरपासून मात्र शहर व जिल्ह्यात दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेने मार्च व एप्रिल महिन्यात मागील सर्व विक्रम मोडीत काढले. या दोन महिन्यांत मृतांची संख्यादेखील विक्रमी ठरली. आता कोरोना रुग्णांच्या संख्येने विक्रमी म्हणजे दोन लाखांचा आकडा पार केला आहे. मंगळवारी दोन हजार २२३ कोरोनाबाधित आढळले. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र दोन हजार २९१, एकूण रुग्ण दोन लाख १५३, एकूण मृत्यू एक हजार ५८५ (मंगळवारचे मृत्यू १६), घरी सोडलेले रुग्ण एक लाख ८१ हजार ३१६, सध्या उपचार घेणारे १७ हजार २५२ रुग्ण आहेत.

 Corona Updates
मराठा आरक्षण देण्याची युक्ती चुकली, पाहा व्हिडिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com