Nashik News: MPSLच्या अधिकाऱ्यांना मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik News: MPSLच्या अधिकाऱ्यांना मारहाण

मालेगाव : शहरातील खासगी वीज कंपनीच्या एमपीएसएल कार्यालयात घुसून तोडफोड व अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ मार्चला हा प्रकार घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी रियाज भिक्कू व साजिद खान या दोघा संशयितांना अटक केली होती.

एमपीएसएलच्या भरारी पथकाने वीज ग्राहक मलीक जैद अमीन याच्या कारखान्यात ८ फेब्रुवारीला छापा टाकून वीज चोरीचा प्रकार उघडकीस आणला होता. त्याचा राग आल्याने मलीक जैदसह अब्दुल अजीज, रियाज भिक्कू, साजिद खान, जुल्फीकार व अन्य पाच ते सात संशयितांनी कार्यालयात तोडफोड करत भरारी पथकाने केलेल्या कारवाईची फाइल व दस्तऐवज पळविल्याने संबंधितांविरुद्ध एमपीएसएलच्या अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान एमपीएसएलच्या भरारी पथकाने दरेगाव शिवारातील स्टार हॉटेलच्या पाठीमागे मोहम्मद ओमेर सादिक अली यांच्या कारखान्यातील वीज चोरीचा प्रकार उघडकीस आणला. सुमारे ३५ लाखाहून अधिक वीजचोरी उघडकीस आणल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी मोहम्मद ओमेर व इम्रान अली सादिक अली यांच्याविरुध्द वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikCrime News