death
death esakal

Nashik Crime News : कोळसा चोरी करताना एकाचा मृत्यू

Nashik Crime News : येथील औष्णिक वीज केंद्रात कोळसा वाहून आणणाऱ्या रेल्वे गाड्यातून कोळसा चोरीच्या उद्देशाने रेल्वेवर चढलेल्या युवकाला ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्याने त्याचा भाजून जागीच मृत्यू झाला. (One killed while stealing coal nashik crime news)

नाशिक औष्णिक वीज केंद्रातील कोळसा हाताळणी केंद्रात कोळसा मालगाडी आल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एकलहरे प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, शरद पोपट जाधव (४, रा. ओढा, ता. जि. नाशिक) हा शनिवारी (ता. ३) सकाळी ११ च्या दरम्यान ओढा येथून एकलहरे औष्णिक वीज केंद्रात कोळसा वाहतूक करणाऱ्या रेल्वेवर चढला होता, त्याचा तोल जाऊन रेल्वेच्या उच्चदाब ओव्हरहेड वायरला शरद याचा धक्का लागल्याने मोठा आवाज होऊन धूर झाला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी

death
Crime News: प्रेमविवाहाचा शेवट झाला दुर्दैवी; पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीने उचललं टोकाचं पाऊल

सदर गाडी दुपारी १२. ४५ वाजता औष्णिक वीज केंद्रातील कोळसा हाताळणी केंद्रात आल्यानंतर रेल्वेतील कोळशावर एक व्यक्ती भाजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर येथील प्रशासनाने नाशिक रोड पोलिसांना माहिती दिली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली रीतसर पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले.

या भागात नेहमीच कोळसा चोरीच्या तक्रारी आहेत, शनिवारी दुपारी कोळशाच्या रेल्वेवर कोळसा चोरी करण्याच्या उद्देशाने अनेक तरुण चढल्याचे सांगितले जाते. मयत शरद याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

death
Nashik Crime News : जाचाला तरुणाची आत्महत्या; 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com