Nashik News : ओझरला कार अपघातात एक जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accidental car

Nashik News : ओझरला कार अपघातात एक जण ठार

ओझर (जि. नाशिक) : मुंबई-आग्रा महामार्गावर सावित्री हॉटेलसमोर पिंपळगावकडे जाणाऱ्या कारने दुभाजकाला धडक देऊन पलटी घेत दुसऱ्या लेनमध्ये येऊन एका ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. (One person killed in car accident in Ozar Nashik News)

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

शनिवारी (ता. २५) रात्री साडेअकराच्या सुमारास रोहित अंकुश शिवणकर (वय ३६, रा. मूळ सातारा, ह. मु. पिंपळगाव) त्यांच्या होंडा कारने (एमएच १५- एफटी ८४५३) नाशिककडून पिंपळगावकडे जात असताना हॉटेल सावित्रीसमोर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकून पलटी घेत नाशिककडे जाणाऱ्या लेनमध्ये येऊन ट्रकवर आदळली.

या अपघातात शिवणकर जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला. ओझर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बोरसे, हवालदार रामदास घुमरे, स्वप्निल जाधव, अमोल गांगोडे, प्रसाद सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेऊन गँसकटरने कारचा पत्रा कट करुन शिवणकर यांचा मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात पाठविला तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.

याबाबत ओझर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. अधिक तपास पोलिस नाईक स्वप्नील जाधव करीत आहेत.