esakal | येवला बाजारपेठेत उन्हाळ कांदा तेजीत; आवकही वाढली

बोलून बातमी शोधा

 onion price increase

येवला बाजारपेठेत उन्हाळ कांदा तेजीत; आवकही वाढली

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : देशांतर्गत बाजारपेठेत मागणी वाढल्याने उन्हाळ कांदा बाजारभावात वाढ झाल्याचे चित्र सोमवारी (ता. २६) येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत पाहायला मिळाले. शनिवारच्या तुलनेत येवल्यात उन्हाळ कांदा बाजारभावात वाढ झाली.

७०० ट्रॅक्टरमधून कांदा आवक

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ७०० ट्रॅक्टरमधून सुमारे १८ हजार क्विंटल कांदा आवक झाली. शनिवारच्या तुलनेत येथे लाल कांदा काहीसा वधारताना उन्हाळ कांदा कमाल व सरासरी बाजारभावात क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली. येथे सोमवारी लाल कांद्यास प्रतिक्विंटल किमान ३०० ते कमाल एक हजार २०१ (सरासरी एक हजार) रुपये, तर उन्हाळ कांद्यास प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल एक हजार ४७१ (सरासरी एक हजार २५०) असा बाजारभाव मिळाला.

हेही वाचा: प्रबळ इच्छाशक्तीने कोरोनावर मात! मनमाडच्या ९२ वर्षीय आजोबांचा लढा

किमान ४००, कमाल १३०० भाव

समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात २४२ ट्रॅक्टरमधून सात हजार क्विंटल कांदा आवक झाली. येथे लाल कांद्यास किमान ३०० ते कमाल एक हजार १८१ (सरासरी ९२५) रुपये, तर उन्हाळ कांद्यास किमान ४०० ते कमाल एक हजार ३०० (सरासरी एक हजार ७०) असा बाजारभाव मिळाला.