
Nashik News : बनावट कृषी निविष्ठाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Nashik News : शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा योग्य दरात व वेळेत प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.
त्यामुळे कलम अथवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येतात निरीक्षक अथवा भरारी पथकाने न्यायालयात अथवा फौजदारी गुन्हा दाखल करावा. (Order to file a case in case of fake agricultural inputs nashik news)
शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. त्यासंबंधीचे परित्रपक जारी करण्यात आले.
खते, बियाणे, कीटकनाशक या कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा व तालुका भरारी पथकातर्फे आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांतर्फे वेळोवेळी कृषी निविष्ठा उत्पादकांसह विक्री कंपनी अथवा केंद्रांची तपासणी करायची आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
संशयास्पद कृषी निविष्ठांचे नमुने काढायचे आहेत. अप्रमाणित अथवा दुय्यम दर्जाच्या कृषी निविष्ठांची जप्ती करायची आहे. अनुदानित खतांचा शेती व्यतिरिक्त विनापरवाना औद्योगिक वापरास प्रतिबंध करायचा आहे. असे गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कायद्यांतर्गत न्यायालयीन अथवा फौजदारी गुन्हा दाखल करायचा आहे.
बियाणे कायदे आणि कलम-नियम-नियंत्रण आदेश, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा कलम, खत नियंत्रण आदेश, खत वाहतूक आदेश व कलम, कीटकनाशक कायदा व कलम-नियम-नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू कायदा कलम आदी बाबी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या आहेत.