इगतपुरी तालुक्यात भात पिके जोमात; पावसामुळे दिलासा

Paddy farming in Igatpuri taluka
Paddy farming in Igatpuri talukaesakal

घोटी (जि. नाशिक) : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील भात पिके जोमात आली आहेत. सर्वत्र हिरवेगार रान दिसत आहे. भात पिके वाऱ्याच्या झुळकाने डोलताना दिसतात. इगतपुरी तालुक्यातील ३२ हजार क्षेत्रावर भात लावणी करण्यात आली आहे. दरवर्षाप्रमाणे यंदा अधिक लावणी करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. धरण परिसरात सधन शेतकऱ्यांनी सिंचनाची व्यवस्था केल्याने डोंगराच्या पायथ्याशी भात लावणी झाली आहे.

इगतपुरी तालुक्याच्या तांदळाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. येथील हवामान पिकांना पोषक असल्याने येथील तांदळाची चव जिभेवर रेंगाळल्याशिवाय राहत नाही. भात पिकाचे वाढलेले क्षेत्र आशादायक आहे. धरण व परिसरात वळण बंधारे बांधण्याचा जोर प्रशासनाने दिल्यास भात क्षेत्रात वाढ होण्यास मदत होणार आहे. भूसंपादन मोठ्या प्रमाणात झाल्याने उंचीवर असलेल्या भागात सिंचनाची सोय करून दिल्यास येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. धुव्वादार पावसामुळे धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या झळा कमी होणार आहेत.

सर्वत्र हिरवेगार रान त्यात भात पिके वाऱ्याच्या झुळकाने डोलताना दिसतात.
सर्वत्र हिरवेगार रान त्यात भात पिके वाऱ्याच्या झुळकाने डोलताना दिसतात.esakal
Paddy farming in Igatpuri taluka
शिवभोजन थाळी वितरणात विभागात 'नाशिक' जिल्हा अव्वल!

भाताचे दर हंगामापेक्षा चांगले असल्याने वाढली आवक

दरम्यान, भात पिकाला हंगामात चांगला दर मिळवा, यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात. सध्या भाताचे दर हंगामापेक्षा चांगले असल्याने बाजारात भाताची आवक वाढली आहे. सुहासिक इंद्रायणी, एक हजार आठ, रुपम, गरी, कोळपीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे.

''सध्या पाऊस चांगला पडत आहे. पुढे पावसाने ओढ दिल्यास सावधगिरी म्हणून डोंगराच्या शेतातील बांध पक्के करावे, वनराई बंधाऱ्यांच्या साठ्यातील पाण्याचा योग्य वापर करून आपल्या खासरात वळवावे. पिके सध्या जोमात असून, रोगाची लक्षणे सध्या तरी दिसून येत नाही.'' - शीतलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी

Paddy farming in Igatpuri taluka
35 बँकांचे पैसे ग्राहकांना मिळणार घरपोच! 'या' मिळणार सुविधा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com