esakal | नाशिककरांची प्रवास वाहिनी पंचवटी 10 मेपर्यंत रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

Panchvati Express

नाशिककरांची प्रवास वाहिनी पंचवटी 10 मेपर्यंत रद्द

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : कोरोनाचा वाढता प्रकोप आणि लॉकडाउनमुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे मनमाड- मुंबई पंचवटी, जनशताब्दी, अमरावती-मुंबई यासह वीस प्रवासी गाडी रेल्वेने रद्द केल्या आहेत. यामुळे काही प्रवाशांचे हाल जरी होणार असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

२७ एप्रिलपासून १० मेपर्यंत या गाड्या बंद राहणार असल्याने नोकरदार, रुग्ण, व्यावसायिक आदींना फटका बसणार आहे. नंदीग्राम मात्र सुरू राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. नागपूर- पुणे गरीब रथ, नागपूर- मुंबई दुरंतो या गाड्या नाशिकला थांबत नाहीत. त्याही बंद राहतील. पुणे- नागपूर, मुंबई- नागपूर, मुंबई- अमरावती, मुंबई- जालना या मुंबईला जाणाऱ्या व परत येणाऱ्या गाड्यांचाही बंदमध्ये समावेश आहे.

हेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!

loading image