Dindori Market Committee Election: दिंडोरी बाजार समितीत परिवर्तन! शेतकरी उत्कर्ष पॅनलला 5 जागा | parivartan panel won in Dindori Market Committee Election nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Supporters of the candidates cheering after the election results

Dindori Market Committee Election: दिंडोरी बाजार समितीत परिवर्तन! शेतकरी उत्कर्ष पॅनलला 5 जागा

Dindori Market Committee Election : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीत गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने बाजी मारत १८ पैकी ११ जागांवर विजय मिळवीत दिंडोरी बाजार समितीवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे. (parivartan panel won in Dindori Market Committee Election nashik news)

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी १८ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत विद्यमान सभापती दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी उत्कर्ष पॅनलची निर्मिती झाली तर गणपतराव पाटील, माजी आमदार रामदास चारोस्कर, सहकार नेते सुरेश डोखळे, भाऊलाल तांबडे,

शहाजी सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलची निर्मिती झाली होती. तीत परिवर्तन पॅनलला ११ जागा तर शेतकरी उत्कर्ष पॅनलला ५ जागांवर समाधान मानावे लागले.

या निवडणुकीत व्यापारी गटाने तटस्थ भूमिका घेऊन कोणत्याही पॅनलकडून निवडणूक न लढवता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच परिवर्तनच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

विजयी उमेदवार असे (मिळालेली मते)

सहकारी संस्था (सर्वसाधारण)- प्रशांत कड- ३४२, गंगाधर निखाडे ३४१, नरेंद्र जाधव ३२८, पांडुरंग गडकरी ३२६, कैलास मवाळ ३२१, बाळासाहेब पाटील ३१५, दत्तात्रय पाटील ३५०. सहकारी संस्था (इतर मागास प्रवर्ग)-प्रवीण जाधव ३७८.

सहकारी संस्था ( भटक्या जमाती)- श्याम बोडके ३३८. सहकारी संस्था (महिला राखीव). विमल जाधव ३४५, अर्चना अपसुंदे ३४७. ग्रामपंचायत (सर्वसाधारण)- दत्तू भेरे ५१०, योगेश बर्डे ५०६. ग्रामपंचायत (अनु.जाती जमाती)- दत्ता शिंगाडे ५३२.

ग्रामपंचायत (आर्थिक दृष्ट्या दुर्बल)- दत्तू राऊत ५५५. व्यापारी मतदार संघ- नंदलाल चोपडा ३०६, अमित चोरडीया ३२६. हमाल तोलारी- सुधाकर जाधव २४.