रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा धोकादायक प्रवास

रेल्वे स्थानकावर फलाट एकवरून दोनवर धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना प्रवासी
रेल्वे स्थानकावर फलाट एकवरून दोनवर धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना प्रवासी esakal

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सध्या प्रवासी धोकादायक प्रवास करत आहे. फलाट क्रमांक दोन व तीनवर जाण्यासाठी किंवा दोन-तीन फलाटावरून एक वर येण्यासाठी नियम मोडून धोकादायक रूळ ओलांडून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. रेल्वे प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे.

सध्या नाशिक रोड रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर प्रवासी विरुद्ध मार्गाने उतरत आहे. याशिवाय धोकादायक पद्धतीने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवेश करीत आहे. रूळ ओलांडणे हा गुन्हा आहे. रूळ ओलांडताना अचानक एखादी गाडी आल्यावर मोठी घटना घडू शकते.

रेल्वे स्थानकावर फलाट एकवरून दोनवर धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना प्रवासी
गॅरेज व्यवसायाकडे तरुणांचा कल

सध्या नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर शेकडोंच्या संख्येने प्रवासी धोकादायक रोड ओलांडत असून, रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाले आहे. रेल्वे पोलिस, सीआरपीएफ व रेल्वे प्रशासकीय विभागाने या धोकादायक रूळ ओलांडणीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहे.

नाशिक रोड रेल्वे स्थानकावर सध्या फलाट क्रमांक दोन आणि तीनवर मालवाहतूक धोकादायक पद्धतीने केली जात आहे प्लॅटफॉर्म एकवरून दोन आणि तीनवर भाजीपाला खाद्यपदार्थ, पाणी बाटल्यांची ने- आण रूळ ओलांडून होते. रोज मालाची वाहतूक धोकादायक पद्धतीने करीत असल्यामुळे अनर्थ होऊ शकतो. असे नागरिकांचे म्हणणे आहे.

रेल्वे स्थानकावर फलाट एकवरून दोनवर धोकादायक पद्धतीने रूळ ओलांडताना प्रवासी
जलसंपदा विभागाचे पदे धोक्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com