
NMC News : अतिक्रमण रोखण्यासाठी शहरात गस्ती पथके; अतिक्रमणाला अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार
नाशिक : शहराचा विस्तार वाढत असताना मालमत्तांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बाजारपेठेतील मिळकती सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अतिक्रमणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मात्र असे असले तरी अतिक्रमण वाढू नये यासाठी पालिकेने कंबर कसली असून आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अतिक्रमण झाल्यास विभागीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गस्ती पथकाच्या माध्यमातून अतिक्रमणे शोधून तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. (Patrol teams in city to prevent encroachment Officials will held responsible for encroachment NMC News)
महापालिकेच्या तालुका आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये जवळपास साडेचारशे कोटी रुपयांची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस विशेष मोहीम राबवून अनधिकृत बांधकामे शोधण्यात आली.
त्या अनुषंगाने जवळपास अडीच हजार अनधिकृत बांधकाम धारकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. निवासी अनधिकृत मालमत्ता शोधण्यांबरोबरच शहरात शहरात मुख्य रस्ते तसेच बाजारपेठांमध्ये अतिक्रमणे वाढली आहे.
रस्त्यावर बाजार भरत असल्याने वाहतूक ठप्प होते, नागरिकांना पायी चालणे मुश्किल झाले आहे.
हेही वाचा: हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?
त्याचबरोबर अनाधिकृत बांधकाम देखील वाढली आहे, त्यामुळे आयुक्त पुलकुंडवार यांनी विभागीय अधिकाऱ्यांना कार्यक्षेत्रात अनाधिकृत बांधकाम होणार नाही. याची दक्षता घेण्याबरोबरच रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने पाठविण्याच्या सूचना दिल्या. त्यासाठी गस्ती पथक नियुक्त करून वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण आणण्याच्या सूचना दिल्या.
मुख्यालय सोडण्यास बंदी
केंद्र व राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरू आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने आमदारांकडून कारण की प्रश्न तसेच लक्षवेधी सूचना मांडल्या जात आहे. अशा वेळी तातडीने माहिती देणे आवश्यक असल्याने मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ पुलकुंडवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.