Latest Marathi News | दिवाळीपूर्वी राज्यकर्मचारी फरकासह महागाई भत्ता द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dearness allowance

Diwali Update : दिवाळीपूर्वी राज्यकर्मचारी फरकासह महागाई भत्ता द्या

नाशिक : राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना केंद्रीय कर्मचारी यांच्याप्रमाणेच दिवाळी सणापूर्वी जुलै २०२२ चा चार टक्के महागाई भत्ता फरकासह देण्यात यावा, अशी मागणी जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

राज्यात मागील दोन वर्षातील कोरोना विष्णूचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत असल्यामुळे राज्यशासनाने निर्बंध शिथिल केल्याने यावर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव आणि सध्या चालू असलेला नवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला आहे.(Pay Dearness Allowance with State employee difference before Diwali Nashik Diwali News)

हेही वाचा: Diwali Update : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठेत जाताना जरा सावधान

त्याचप्रमाणे दिवाळीसण पण मोठ्याप्रमाणावर साजरा होणारा आहेच. ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांक माहे जून २०२२ मध्ये ०.२ गुणाने वाढ झाल्याने व एकूण ऑल इंडिया ग्राहक किंमत निर्देशांक १२९.०२ वर पोचला आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने, केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वी चार टक्के महागाई भत्ता फरकासह देण्याचे जाहीर केले व त्याप्रमाणे आदेश पारित केलेले आहेत. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करत राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना केंद्रीय कर्मचारी यांच्याप्रमाणेच दिवाळी सणापूर्वी जुलै २०२२ चा चार टक्के महागाई भत्ता फरकासह देण्यात यावा अशी मागणी यावेळी केली. निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष उत्तम गांगुर्डे यांची स्वाक्षरी आहे.

हेही वाचा: Deepika Padukone : दीपिकाच्या फोटोवर रणवीर झाला फिदा...

टॅग्स :Diwali FestivalNashik