नाशिकमध्ये दारूविक्री दुकानदारांना चांगलीच महागात पडली

Liquor sale
Liquor saleesakal

जुने नाशिक : नूतन वर्षानिमित्ताने दारूविक्रीचा मोह मद्यविक्रेत्या दुकानदारांना चांगलाच महागात पडला. मद्य खरेदीसाठी कोरोना प्रतिबंधक नियम (Corona restrictions) पायदळी उडवत गर्दी केल्याने दुकानदारांना दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागले. त्यांच्याकडून ३१ डिसेंबरच्या रात्री ५६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला.

७ मद्यविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका व जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शुक्रवार (ता. ३१) नूतन वर्षाच्या निमित्ताने आयोजित सर्व प्रकारच्या कार्यक्रमावर निर्बंध घालण्यात आले होते. शिवाय कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशित करण्यात आले होते. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्तांकडून विभागीय कार्यालयातील घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पूर्व विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री पूर्व विभागात येणाऱ्या विविध भागात पाहणी करत धडक कारवाई केली. ५ वाइन शॉप, २ हॉटेलवर दंडात्मक कारवाई करत ५६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Liquor sale
आमदार हिरामण खोसकरांना कोरोनाचा विसर; किर्तनात झाले दंग

पाच वाइन शॉप समोर रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मद्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. नियमांचा फज्जा उडाला होता. दुकानदाराने गर्दीकडे दुर्लक्ष केल्याने पथकाने वाइन शॉप चालकांवर दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी दहा हजारांचा दंड वसूल केला. त्याचप्रमाणे दोन हॉटेलमध्ये १३ जण विनामास्क आढळून आल्याने त्यांनादेखील दंड करत सुमारे ६ हजार ५०० चा दंड वसूल करण्यात आला. कारवाई दरम्यान दुकानदार तसेच ग्राहकांनी पथकाबरोबर अरेरावी करत वाद घातला. कुठल्याही दबावाला बळी न पडता पथकाने त्यांच्यावर कारवाई करणे सुरू ठेवले.

अशी झाली कारवाई
आस्थापना दंड
नाईट कॅफे १० हजार
काका ढाबा १० हजार
गोविंदा वाईन्स १० हजार
रेश्मा वाइन १० हजार
रावळ वाईन्स १० हजार
हॉटेल कोर्टयार्ड ५ हजार
हॉटेल सूर्या १ हजार ५००

Liquor sale
जळगाव : येऊ द्या कोरोना, आम्ही मास्क लावणारच नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com