नाशिक : लोकप्रतिनिधींच्या सेटिंगने नागरिक वेंटिंगवर

Nashik
Nashikesakal

सिडको (नाशिक) : नागरिकांनी विसरून जाऊ नये, म्हणून महापालिका निवडणुकीच्या (Municipal election) तोंडावर विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन करायचा बेत डोळ्यासमोर ठेवून लोकप्रतिनिधींनी काही नागरी उपयोगाची विकासकामे जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याचे सिडकोत बघायला मिळत आहे. या विकासकामांचे लवकरात लवकर भूमिपूजन व उद्‌घाटन करून नागरिकांना त्या कामांचे सुख उपभोगता यावे, अशी रास्त अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

यात विशेषकरून अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन व सिडकोची घरे ‘फ्री टू लीज होम’ (Free to Lease Home) करण्याचे भाजपच्या विद्यमान आमदार कदाचित विसरल्याही असतील. मात्र, सिडकोवासीय आजही त्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. वारंवार त्या संदर्भात विचारणा करताना दिसतात. निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने नागरिकांच्या लक्षात असून, आश्वासनांची पूर्तता न करणाऱ्यांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीत धडा शिकवू, असा प्रण मतदारराजाने सोडल्याचे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिसून येत आहे.

Nashik
आर्मीचा गणवेश घालून शिरला आर्टिलरी कॅम्पमध्ये, नाशकात एकाला अटक

प्रलंबित उद्‌घाटने

पाथर्डी फाटा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, १७ एकर जमिनीवरील सेंट्रल पार्क, अंबड गावातील शाळेची इमारत, संभाजी स्टेडियमवरील खासदार व महापालिका निधीतील खेलो इंडिया खेलोचा (Khelo India) प्रकल्प, अंबड एमआयडीसीमधील (MIDC) आयटी पार्क (IT park), लेखानगरमधील पाकिस्तान युद्धातील रणगाडा आदी.

प्रलंबित भूमिपूजने

दिव्या ॲडलॅब ते मायको सर्कलदरम्यान होणाऱ्या २५० कोटी रुपयांचा उड्डाणपूल, बीओटी तत्त्वावरील दादासाहेब फाळके स्मारक, अंबड पोलिस ठाण्यामागील महापालिकेच्या जागेत होणारा ऑक्सिजन प्लांट, पांजरपोळवरील सिडकोचा प्रकल्प, पाथर्डी फाट्यावरील वाहतूक बेट, विखे पाटील शाळेशेजारील महिलांसाठी जलतरण तलाव, नंदिनी नदीचे सुशोभीकरण आदी.

Nashik
नाशिक टीडीआरच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com