Ramzan | चांदोरीकर जोपासताय सामाजिक ऐक्य

Iftar
Iftaresakal

चांदोरी (जि. नाशिक) : हिंदू आणि मुस्लीम (Hindu Muslim) यांच्या ऐक्यातून गेले अनेक वर्षापासून सुरू असलेली चांदोरी मधील इफ्तार पार्टीची सर्वधर्मसमभावाची परंपरा देशात आदर्श ठरणारी आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने प्रगती केली असली तरी धर्मांध राजकारण करणाऱ्यांत देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली.अशा परिस्थितीत मुस्लिम उत्सवाच्या रमजान (Ramzan Festival) महिन्यात इफ्तार पार्टीला (Iftar Party) उपस्थित हिंदू व्यक्ती अशी परंपरा देशात फक्त चांदोरी मध्येच पाहायला मिळत आहे.

सांप्रदायिकता (Sectarianism) हे भारताचे वैशिष्ट्ये आहे.आपल्या देशात एकीकडे हिंदु-मुस्लिम वाद चिघळताना दिसतो तर दुसरीकडे तेच हिंदु-मुस्लिम एकजुटीने राहताना दिसतात.याचा प्रत्यय आलाय चांदोरीतील जेष्ठांच्या मार्गदर्शनात मुस्लिम युवकांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टी मध्ये.येथे हनुमान मंदिर आणि मस्जिद शेजारी शेजारी असून परंपरागत सलोख्याचे वातावरण आहे.

Iftar
Ramzan festival | रमजानची खरेदी रिक्षा व्यवसायिकांच्या पथ्यावर

शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आयोजन करण्यात आले होते. इफ्तार पार्टी नंतर हनुमान मंदिरात सचिन पाटील यांच्या हस्ते आरती प्रसंगी मुस्लीम बांधवांसह हिंदू बांधव ही उपस्थित होते.

Iftar
Ramzan Festival | मालेगावी कपड्यांच्या खरेदीला पसंती

सामाजिक सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोक एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व धर्मांमध्ये समानतेची जाणीव निर्माण करून आपापसांतील बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी चांदोरी गावातील कार्यक्रमांचा आदर्श घेत दोन समाज एकत्र आल्याने मतभेद दूर होऊन बंधुत्त्व भावना वाढीस लागण्यास मदत होणार आहे. अशा सणांमुळे हिंदू-मुस्लिम बांधव मनापासून एकत्र येतात. सामाजिक सलोखा राखण्यात इफ्तार पार्टीची मोठी मदत होत असून त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृद्धिंगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी इफ्तार पार्टी प्रसंगी व्यक्त केले.

प्रसंगी हजरत मेहबूब मिया कादरी, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, सुन्नी जामा मज्जीद पंच कमिटी, मारुती मंदिर पंच कमिटी, सायखेडा पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com