Gopinath Munde Smarak : लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पण सोहळा तयारी अंतिम टप्प्यात! | Latest Marathi News | Nashik News | Sinnar News | BJP News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A 16-feet full-length bronze statue of the people's leader Gopinath Munde erected at Nandurshingote.

Gopinath Munde Smarak : लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारक लोकार्पण सोहळा तयारी अंतिम टप्प्यात!

विकास गिते

सिन्नर (जि. नाशिक) : नांदूरशिंगोटे येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक, पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शनिवार दि 18 मार्च रोजी सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ५० हजारावर नागरिक येणार आहेत. त्या दृष्टीने आसन व्यवस्था करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण सोहळा होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, हेमंत गोडसे आदी उपस्थित राहणार आहेत.

(Peoples leader Gopinath Munde memorial inauguration ceremony preparations in final stage nashik news)

दोन एकराच्या तळ्यात उभे राहिले आकर्षक स्मारक

नांदूरशिंगोटे येथे गावालगत दोन एकराच्या तळ्यात साठवणीचे पाणी राहत होते. या तळ्यालाच आकर्षक रूप देण्यात आले आहे. तळ्याच्या मध्यभागी गोपीनाथ मुंडे यांचा १६ फूट उंचीचा ब्रांझचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे.

आकर्षक विद्युत रोषणाई, तळ्याभोवती जॉगिंग ट्रॅक, बगीचा, परिसरात झालेली सुशोभीकरणाची कामे यामुळे स्मारकाला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. युवानेते उदय सांगळे यांच्या संकल्पनेतून हे स्मारक उभे राहिले.

त्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, नाईक संस्थेचे हेमंत धात्रक यांचे मार्गदर्शन लाभले.

१५ दिवसात १०० जनजागृती बैठका

सोहळ्या बाबत गावागावात माहिती व्हावी याकरिता एक दिवस लोकनेत्यासाठी या शीर्षकाखाली नियोजन व जनजागृती बैठका सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात १५ दिवसात वेगवेगळ्या गावांतील नागरिकांच्या १०० बैठका घेण्यात आल्या.

अजूनही २० अधिक बैठका घेण्यात येणार आहेत. सोहळा देखण्या स्वरूपाचा पार पाडण्यासाठी युवा नेते उदय सांगळे यांच्याकडून बैठकांत जनजागृती केली जात आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव आदी तालुक्यातही बैठका घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

लोकनेते गोपीनाथ मुंडे पुतळा लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे :

माजी आमदार वाजे यांचे बैठकीत आवाहन

गावा गावातील प्रत्येक नागरिकांनी, कार्यकत्यांनी नांदूरशिंगोटे येथे दि. १८ मार्च रोजी होणाऱ्या लोकनेते गोपीनाथ मुंडे पुतळा लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. सोहळा नियोजन बैठकीत ते बोलत होते.

युवा नेते उदय सांगळे, मजूर फेडरेशनचे संचालक भारत कोकाटे, सरपंच रवींद्र पवार ,पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख दीपक खुळे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, माजी नगरसेवक मनोज भगत, शैलेश नाईक, विनायक शेळके, विठ्ठल राजेभोसले, भजूनाथ शिरसाट, देविदास वाजे, सरपंच अरुण वाघ आदी उपस्थित होते.

राजाभाऊ वाजे यांनी असे आवाहन केले की हा कार्यक्रम सर्वांचा असून त्यात प्रत्येकाने सहभाग घ्यावा. गावागावातून कार्यक्रमासाठी प्रत्येकाने येणे आवश्यक आहे. असे आवाहन केले.

वेगवेगळ्या गावात बैठका घेण्यात आल्या आहेत. अजूनही बैठका सुरू असून नियोजनबद्ध का कार्यक्रम आखण्यात आल्याची माहिती दिली. कार्यक्रमात प्रत्येकाने सहभागी व्हावा, लोकनेत्यासाठी एक दिवस म्हणून उपस्थित राहण्याचे आवाहन केले. युवा नेते उदय सांगळे यांनी १८ मार्च रोजी होणाऱ्या लोकार्पण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली.