गोदावरी गंगाघाटाला पहारा
गोदावरी गंगाघाटाला पहारा esakal

नाशिक : गोदाघाट परिसर मोकळा श्‍वास घेणार

नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार (Municipal Commissioner Ramesh Pawar) यांनी गोदावरी (Godavari River) घाटावरील अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिल्यानंतर आता अतिक्रमणधारक पुन्हा बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी गोदाघाटावर कायमस्वरूपी सुरक्षारक्षकांचा पहारा नेमला आहे.

मागील आठवड्यात स्वतः आयुक्तांनी साध्या वेशात जाऊन गोदावरी (Godavari River) घाटावरील पर्यटकांच्या भूमिकेतून ३ तास फेरफटका करीत अतिक्रमणांचा प्रश्न समजून घेतला होता. त्यानंतर आठवडाभर या भागात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. त्यानंतर आता या भागात दिवसभर या भागात कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमून अतिक्रमण धारकांना चाप लावला आहे. उपायुक्त करुणा डहाळे यांनी ही माहिती दिली.

आयुक्तांच्या सूचनेनंतर अतिक्रमण (Encroached) निर्मूलन विभागाने या भागातील अतिक्रमण काढण्यावर भर दिला. वारंवार बसणाऱ्यांचे साहित्य जप्त केले आहे. गोदावरी घाटावर पूजा साहित्य विक्री वगळता कोणतेही दुकाने येथे लावता येणार नसल्याचे यापूर्वीच ध्वनिक्षेपकावर सूचना देत जनजागृती केली.

आता त्यापुढे जाऊन गोदावरी घाटावर कायमस्वरूपी दिवसभर अतिक्रमण होऊ नये, याकरिता दोघा सुरक्षारक्षकांचा पहारा राहणार आहे. देशभरातून भाविक गोदावरी घाटावर येतात. पण या भागातील अनधिकृत अतिक्रमणांमुळे भाविकांना त्रास होतो. पूजेसाठी असलेले साहित्य घेण्यासाठी अडथळे येतात.

गोदावरी घाटावर अनधिकृत विक्री दुकाने थाटू नये यासाठी कायमस्वरूपी दोघा सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरक्षा अधिकारी मधूकर शिंदे यांनी गंगाघाटावर जाऊन तेथे विक्रेत्यांना बसण्यास प्रतिबंध केला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून गंगाघाटावर विक्रेत्यांच्या होणाऱ्‍या अनधिकृत गर्दीला चाप बसणार आहे. तसेच या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. दरम्यान, यापुढे गोदाघाट परिसर मोकळा श्‍वास घेणार आहे.

गोदावरी गंगाघाटाला पहारा
‘नमामि गोदा’साठी आयुक्तांकडून समिती

अतिक्रमणधारकांना चाप

गंगाघाटावरील अतिक्रमण होऊच नये याकरिता गेल्या आठवड्यापासून दररोज सकाळी अतिक्रमण विभागाची मोहीम सुरू आहे. विशेष म्हणजे शनिवार व रविवार या शासकीय सुटीच्या दिवशीदेखील विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांना चाप बसला आहे. त्यातच आता सुरक्षारक्षकांचा पहारा राहणार असल्याचे विक्रेत्यांना दुकान लावणे अवघड होणार आहे.

गोदावरी गंगाघाटाला पहारा
गोदावरी पुनरुज्जीवनासाठी 'बांबू लागवड' पर्याय

"गंगाघाटावरील बसणाऱ्या विक्रेत्यांना प्रतिबंधासाठी आता कायमस्वरूपी दोन सुरक्षारक्षक असणार आहे. मंगळवार (ता. २६) पासून सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिक्रमणधारकांना येथे येण्यास प्रतिबंध केला जाणार आहे."

- करुणा डहाळे, अतिरिक्त आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com