Nashik Crime News : कलेक्टरपट्टा भागात एकावर हल्ला; ठार मारण्याचा प्रयत्न | person tried to kill young man in Collectorate area malegaon nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nashik Crime News : कलेक्टरपट्टा भागात एकावर हल्ला; ठार मारण्याचा प्रयत्न

Nashik Crime News : शहरातील कलेक्टरपट्टा भागात अंजिक्य चौकातील सार्वजनिक ठिकाणी तरुणास दोघांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

मागील भांडणाच्या वादातून झालेल्या किरकोळ बाचाबाचीचे पर्यावसन दोन गटात हाणामारीत झाले. मारहाणीत लोखंडी सळई, कोयत्याचा वापर करण्यात आला. यात एक जण गंभीर जखमी झाला. (person tried to kill young man in Collectorate area malegaon nashik news)

येथील शुभम फकिरा सपकाळ (२३, रा. इंद्रकुटनगर, कलेक्टरपट्टा) हा व त्याचा मित्र दुचाकीने जात असताना त्यांची गाडी अडवून शुभमला ‘तुला माज आला का, बऱ्याच दिवसापासून तू कधी एकटा भेटशील यासाठी तुझी वाट पाहत होतो’ असे म्हणत तेथेच राहणाऱ्या हर्षल उर्फ लहान्या देविदास जाधव (२३) व चेतन परदेशी यांनी लोखंडी सळईने डोक्यावर, कपाळावर वार केले.

चेतनने शुभमला पकडून ठेवून हर्षलने लोखंडी सळईने वार करुन तुला जिवे ठार मारतो असा दम देत शिविगाळ केली. मारहाणीत शुभम गंभीर जखमी झाला. गुरुवारी (ता. २८) सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

शुभमच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द मारहाणीचा व खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याउलट हर्षल जाधव याने दिलेल्या फिर्यादीत हर्षल याने शुभम फकिरा सपकाळ (२०, रा. साईबाबा कॉलनी, कलेक्टरपट्टा) याला फोनवरुन सांगितले की, तू आपल्या चौकात मुस्लीम समाजाचे पोरे आणत जाऊ नको असे सांगितल्याचा राग आल्याने व मागील भांडणाची कुरापत काढून अजिंक्य चौकात येवून हर्षलच्या दुचाकीची तोडफोड केली.

कमरेला पॅन्टमध्ये असलेल्या कोयत्याने वार करत शिवीगाळ केली. हर्षलच्या तक्रारीवरुन छावणी पोलिस ठाण्यात शुभमविरुध्द शस्त्रास्त्र कायद्यान्वये व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikcrimemurderBeating