Nashik : अडीच वर्षानंतर फाळके स्मारक उघडणार

Phalke Smarak
Phalke Smarakesakal

नाशिक : अडीच वर्षांपासून बंद असलेले महापालिकेचे फाळके (Falake memorial) उद्यान सोमवारी (ता. २०) उघडणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील डागडुजीची कामे सुरू असून, काम अंतिम टप्यांत आले आहे. तसेच आयुक्त रमेश पवार (NMC commissioner) हे स्वतः: उद्यानाची पाहणी करणार आहे. (Phalke memorial to open after two and half years Nashik News)

Phalke Smarak
येवल्यात वीज पडून 2 जनावरे मृत्युमुखी

नाशिकसह पर्यटकांचे नेहमीच लक्ष वेधून घेणारे फाळके स्मारक अडीच वर्षांपासून बंद आहे. कोरोना महामारीमुळे निर्बंध लागू झाल्याने हे उद्यान बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने निर्बंधांमध्ये वेळोवेळी आणि नंतर संपूर्ण शिथिलता आल्यानंतरदेखील हे उद्यान बंद आहे. बाहेरून आलेले पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देतात. मात्र, अडीच वर्षांपासून हे उद्यान बंद असल्याने ते कधी सुरू होणार असा प्रश्न नाशिककरांकडून विचारणा होत होती. महापालिका प्रशासनाने येथील कारंजा व इतर छोटी-मोठी कामे पूर्ण करून पुढील आठवड्यापासून उद्यान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Phalke Smarak
जेंव्हा मोकाट वळूच्या तोंडात अडकतो पत्र्याचा डबा..!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com