Nashik Accident: बोरटेंभे शिवारात पुलाचा कथडा तोडत पिकअप थेट रेल्वे ट्रॅकवर; 2 जखमी, मोठी जिवीतहानी टळली

The railway workers while moving the pick-up vehicle that broke the wall of the railway bridge and fell directly on the 35 feet railway track.
The railway workers while moving the pick-up vehicle that broke the wall of the railway bridge and fell directly on the 35 feet railway track.esakal

Nashik Accident : नाशिक-मुंबई महामार्गावरील बोरटेंभे शिवारात रेल्वे पुलावरून शनिवार ( ता.१३ रोजी ) दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक पिकअप पुलाचा कथडा तोडून थेट रेल्वे ट्रॅकवर आली.

या विचित्र अपघातात दोन जण जखमी झाले असुन सुदैवाने यावेळी भुसावळ इगतपुरी मेमो गाडी येत असल्याने येथे हजर असलेल्या रेल्वे कर्मचारी यांनी या रेल्वे गाडीला लाल झेंडा दाखवत मेमोच्या दिशेने पळत सुटले.

यावेळी मेमो चालकाने रेल्वे थांबवल्यामुळे मोठी जिवितहानी टळली. (Pick up directly on railway track breaking wall of bridge in bartembhe Shiwar 2 injured major loss avoided Nashik Accident news)

मुंबईहुन फुले खाली करून मालुंजे ता.इगतपुरी येथील पिकअप क्र. MH15 GV4694 ही गाडी बोरटेंभे परीसरात आली असता दुपारी तीन वाजेच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही पिकअप महामार्गावरील रेल्वे पुलाचे संरक्षक कथडे तोडून थेट ३५ फुट खोल असलेल्या रेल्वे ट्रॅकवर येऊन आदळली.

यावेळी येथे हजर असलेल्या ७ ते ८ रेल्वे कर्मचारी यांनी प्रसंगवधान राखत भुसावळहुन इगतपुरीकडे येणाऱ्या रेल्वे मेमो एक्सप्रेसला लाल झेंडा दाखवुन थांबविल्यामुळे मोठी जिवितहानी टळली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

The railway workers while moving the pick-up vehicle that broke the wall of the railway bridge and fell directly on the 35 feet railway track.
Mumbai Crime : 'आयटी'मधील महिलेचा सार्वजनिक शौचालयात व्हीडिओ केला; नवी मुंबईतल्या घटनेने खळबळ

घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, रेल्वे सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलीस, इगतपुरी पोलीस यांनी धाव घेऊन रेल्वे ट्रॅक वरील पिकअप बाजुला केली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहे त्यांना जगतगुरु नरेंद्राचार्य मोफत रुग्णवाहीकेतुन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रेल्वे कर्मचारी यांनी भुसावळ कडून येणारी रेल्वे एक्सप्रेस थांबवली नसती तर मोठी जिवीतहानी झाली असती अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.

The railway workers while moving the pick-up vehicle that broke the wall of the railway bridge and fell directly on the 35 feet railway track.
Crime News : "तू कोणासोबत बोलत होतीस" अशी विचारणा करत जीमहून परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com