
Nashik News : कर वसुलीसाठी पिंपळगाव ग्रामपंचायतीचा कारवाईचा बडगा! 18 नळ कनेक्शन तोडले
पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : थकीत कर वसुलीसाठी पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीचे कर थकीत असलेल्या नागरिकांचे नळकनेक्शन तोडण्याचा निर्णय आज पिंपळगाव ग्रामपंचायतीने घेतला.
शुक्रवारी (ता. १०) एकाच दिवशी १८ नळकनेक्शन तोडण्यात आले. कारवाईमुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले असून कारवाईमुळे गत दोन महिन्यात वसुलीचा टक्का वाढून ५५ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. (Pimpalgaon Gram Panchayat action for tax collection 18 tap connection broken Nashik News)
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
घरपट्टी, पाणीपट्टी व व्यावसायीक कर थकल्याने पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासनापुढे मोठा पेच उभा राहिला होता. करवसुली अभावी विकासकामांबरोबरच दैनंदिन खर्च ही भागविणे अशक्य झाले होते.
सरपंच भास्करराव बनकर यांनी ग्रामपंचायतीची सूत्रे हाती घेतल्यानंतर कर थकबाकी वसुलीला प्राधान्य दिले. त्यासाठी कारवाईचा कटू निर्णयही घेतला. त्यामुळे तीन कोटी ६८ लाख रुपये म्हणजे ६५ टक्के घरपट्टी तर एक कोटी १० लाख रुपये म्हणजे ५५ टक्के एवढी पाणीपट्टी वसुली झाली आहे.
उर्वरित कर वसुलीसाठी पिंपळगाव ग्रामपंचायत प्रशासन पुन्हा ॲक्शनमोडमध्ये आले आहे. तब्बल १८ थकबाकीदारांवर कारवाई करत नळ कनेक्शन तोडण्यात आले. ग्रामविकास अधिकारी एल. जे. जंगम यांच्या पथकाने ही कारवाई केली.