
Nashik : नियोजन कोलमडल्याने व्यवसायावर परिणाम; प्लॅस्टिक कापड विक्रेत्यांना पहिल्या पावसाची प्रतीक्षा
Nashik : यंदा वर्षभर अवकाळी पाऊस पडल्याने प्लॅस्टिक कापड विक्रेत्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. सीझन असताना सध्या दहा ते पंधरा टक्क्यांवर विक्री आली आहे.
या काळात पाऊस पडल्यास विक्री जोमात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विक्रेत्यांना पहिल्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. (Planning collapse impacts on business Plastic cloth vendors wait for first rain Nashik news)
मेच्या शेवटी एखाद्या दिवशी पाऊस पडत असतो. तसेच जून महिन्यामध्ये मॉन्सूनला सुरवात होतच असते. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच प्लॅस्टिक कापड खरेदीसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांकडून बाजारपेठेत गर्दी केली जाते.
यंदा मात्र बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे. प्लॅस्टिक विक्रेते व्यावसायिक ग्राहकाच्या प्रतीक्षेत बसून असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडून पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. पाऊस पडताच नागरिकांची मागणी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
घरांवर टाकण्यासह पीक झाकून ठेवणे, कांद्याच्या जाळीला आवरण लावणे, शेतीमध्ये कामगारांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे प्लॅस्टिक कापडाचे घर उभारणे अशा विविध कामांसाठी प्लॅस्टिक कापडाचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे वाहनधारकांकडूनदेखील प्लॅस्टिक कापड, ताडपत्री यांची मागणी वाढत होत असते.
या वर्षी वर्षभर अवकाळी पाऊस झाल्याने सर्वांचे नियोजन कोलमडले आहे. त्याचा मोठा परिणाम यंदाच्या व्यवसायावर झाल्याचेही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. दरांमध्ये काहीशी वाढ झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
"अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. दरवर्षी मे महिन्यात ५० टक्के खरेदी विक्री होत होती, सध्या दहा ते पंधरा टक्के व्यवसाय झाला आहे. पहिला पाऊस पडल्यास व्यवसायात तेजी येण्याची शक्यता आहे." - अनिल बागूल, व्यावसायिक
असे आहे दर
प्लॅस्टिक कापड ताडपत्रीचे प्रकार दर
पावसाळी प्लॅस्टिक ९० ते १४० किलो पातळ वर्जिन प्लॅस्टिक २० ते ७० मिटर
जाड वर्जिन प्लॅस्टिक १५० ते १८० मिटर
सहा प्रकारची पावसाळी ताडपत्री १३० ते ६ हजार
नायलॉन ताडपत्री ७२० ते १ हजार ४००
प्लॅस्टिक रोल ५० ते १५० मिटर
नायलॉन दोरी १८० किलो
रेशम आणि सूत दोरी बंडल ७० ते १५०
रिक्षा कव्हर ५५०
दुचाकी कव्हर १०० ते ७००
चारचाकी कव्हर ६५० ते १ हजार ८००