Nashik Crime : अवैध दारूअड्ड्यांवर शहर पोलिसांच्या धाडी; एक्साईज विभाग मात्र निद्रिस्त

Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime News : गेल्या चार महिन्यांमध्ये शहरात १०२ अवैध दारूअड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून उद्‌ध्वस्त केले आहेत. झोपडपट्टी परिसरामध्ये आडोशाला देशी दारुची छुप्यारीतीने राजरोस विक्री केली जाते. (Police raided and destroyed 102 illegal bars nashik crime news)

खबऱ्यांकडून माहिती मिळताच पोलिसांकडून कारवाई केली जाते. परंतु, ज्या विभागावर अवैध मद्यव्रिकी वा मद्याची वाहतुकीवर कारवाई करण्याची जबाबदारी आहे, तो राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज) मात्र निद्रिस्त असल्याचेच यातून ठळकपणे समोर आले आहे.

अंबड पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) चुंचाळे शिवारातील घरकुल योजना परिसरातील दारूअड्ड्यांवर छापा टाकला. पोलिसांनी संशयित सोनू चंदर जाधव (६५) यास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. हवालदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

तसेच एक्स्लो पॉइंट परिसरातील दत्तनगरमध्ये श्यामा किराणा स्टोअर्सच्या भिंतीच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. १ हजार १५५ रुपयाच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करीत राजेश वामन देवकर (३९, रा. माहेश्वरी प्लाझा, आठवलेनगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik Bribe Crime : चांदवड तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

तर, टाकळी गावात एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूअड्ड्यांवर छापा टाकून प्रशांत चंदर लोखंडे (३०, रा. रामदास स्वामी मठाजवळ, आगर टाकळी, उपनगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. उपनगर पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही कारवाई केली. या वेळी पोलिसांनी तीन हजार १५० रुपयांची देशी दारूच्या सिलबंद बाटल्या जप्त केला.

याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मखमलाबाद गावातही सुरू असलेल्या अवैध दारूअड्ड्यांवर धाड टाकून पोलिसांनी सातशे रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिसात संशयित सचिन रामदास पेंढारकर (३६, रा. मखमलाबाद गाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतनगरमधील शिवाजीवाडीतही अवैध दारूविक्री सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली. एक हजार ५० रुपयांचा देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. मंगळवारी झालेल्या या कारवाई प्रकरणी मुंबई नाका पोलिसात संशयित प्रभाकर संतू दाते (४३, रा. शिवाजीवाडी, भारतनगर) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Crime News
Nashik Crime: सप्तशृंग गडावर गर्दीमुळे पर्स, दागिने चोरटे सक्रीय; महिला पोलिसाने मिळवून दिली गहाळ झालेली चैन

चार महिन्यातील आकडेवारी

अवैध दारूअड्ड्यावरील धाडी : १०२

अटक करण्यात आलेले संशयित : १३२

एक्साईज उदासीन

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूव्रिकी व चोरटी वाहतुकीवर कारवाई केली जाते. मात्र, गेल्या चार महिन्यात पोलिसांनी आयुक्तालय हद्दीमध्ये १०२ दारूअड्ड्यावर कारवाई करीत ते उद्‌ध्वस्त केले. परंतु, यासंदर्भात एक्साईजकडून शहरात अवैध दारूविरोधात एकही कारवाई करण्यात आलेली नाही, याचे आश्‍चर्य व्यक्त होते आहे.

विशेषत: शहराच्या मध्यवर्ती भागात या विभागाचे कार्यालय असून उपायुक्त व अधीक्षक यांच्यासह मोठा कर्मचारी वर्गही आहे. असे असतानाही शहरात राजरोसपणे अवैध मद्याचे अड्डे सुरू राहतात आणि त्यावर एक्साईजऐवजी शहर पोलिस कारवाई करीत आहेत.

Crime News
Nashik Crime : किरण निकम खूनप्रकरणी चौघांना जन्मठेप; लाड प्राणघातक हल्ला प्रकरणी दोघांना जन्मठेप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com