Positive News : 87 वर्षीय आजींनी दिली सैनिकांना 5 लाखाची भेट! वाढदिवसाच्या कार्यक्रमांना फाटा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushila Kulkarni giving gift

Positive News : 87 वर्षीय आजींनी दिली सैनिकांना 5 लाखाची भेट! वाढदिवसाच्या कार्यक्रमांना फाटा

नाशिक : वाढदिवस म्हटला की प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. नाशिकमधील ८७ वर्षीय आजींनी आपल्या वाढदिवशी देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी ला‍वणार्या सैनिकांच्या कल्याण मंडळास पाच लाखांचा धनादेश देत सैनिकांप्रती आपले ॠण व्यक्त केले. (Positive News 87 year old grandmother sushila kulkarni gave gift of 5 lakhs to soldiers nashik news)\

लघुउद्योग भारती संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांच्या सुशिला कुलकर्णी या मातोश्री आहेत. आयुष्यातील अनेक चढ उतार त्यांनी बघितले. अनेक संकटांचा सामना करतांना स्वतः त्या दोनवेळा मोठ्या आजारातून बचावल्या.

देशसेवेसाठीच आपल्याला परमेश्वराने बचावले अशी भावना निर्माण झाल्याने त्यांनी सैनिकांसाठी मदत देण्याचा मनोदय विवेक कुलकर्णी यांच्याकडे बोलून दाखवला. त्यानुसार सुशिला कुलकर्णी यांच्या वाढदिवशी सैनिक कल्याण मंडळास पाच लाखाचा धनादेश दिला.

निवृत्त कमांडर विनायक आगाशे आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडाळाचे ले. कमांडर ओंकार कापले यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आपल्या मदतीचा विनियोग सैनिकांबरोबर त्यांच्या अवलंबितांवर करण्याची ग्वाही कापले यांनी दिली.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यावेळी गीता आगाशे, सैनिक कल्याण मंडळाचे सहाय्यक अधिकारी अविनाश रसाळ यांच्यासह विवेक कुलकर्णी, स्वाती कुलकर्णी, दिनेश खरे, स्नेहल खरे, प्रशांत थोरात, संदीप शेटे, कमलाकर शेटे, सुमेध कुलकर्णी उपस्थित होते.

"देशाच्या सीमेवर लढणारा जवान आपल्या कुटूंबापासून दूर राहून देशासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत असतो. खरे तर त्यांच्यामुळेच आपण सुरक्षीत आहोत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आपण आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सैनिक कल्याण मंडळाला धनादेश दिला." - सुशिला कुलकर्णी