esakal | विश्वास नांगरे पाटील यांची बदली? 'इथे' बदली होण्याची शक्यता; चर्चेला उधाण
sakal

बोलून बातमी शोधा

vishwas nangre.jpg

 डॅशिंग IPS म्हणून ओळख असणाऱ्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांची कुठे आणि कधी बदली होणार याची अद्याप अधिकृत माहिती नसली, तरी कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची चर्चा आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची बदली? 'इथे' बदली होण्याची शक्यता; चर्चेला उधाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : डॅशिंग IPS म्हणून ओळख असणाऱ्या पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीची चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरु आहे. IPS विश्वास नांगरे पाटील यांची कुठे आणि कधी बदली होणार याची अद्याप अधिकृत माहिती नसली, तरी कार्यकाळ संपल्याने त्यांच्या बदलीची चर्चा आहे. वाचा पुढे..


नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न

विश्वास नांगरे पाटील यांची फेब्रुवारी २०१९ मध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. नाशिकचे तत्कालिन पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या जागी नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली होती. त्याआधी नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.नांगरे पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नाशिकमधील कायदा-सुव्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न केला. नाशिकमध्ये कोरोनाचं मोठं संकट असतानाही, कायदा सुव्यवस्था राखण्यात नांगरे पाटील यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांच्या बदलीला स्थगिती मिळते की त्यांना पदोन्नती मिळून मुंबईत त्यांची सहआयुक्तपदी बदली होते याबद्दल अनेक चर्चा सुरु आहेत.

तरुणाईचे रोल मॉडेल

महाराष्ट्रातील तरुणांचे रोल मॉडेल आणि पोलिस सेवेतील धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून परिचित असलेले विश्वास नांगरे पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. शिराळा तालुक्यातील कोकरुड हे त्यांचे मूळ गाव. विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता. म्हणून आजही त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून पाहतात. स्पर्धा परीक्षा करुन पोलिस सेवेत येऊ पाहणाऱ्यांचे विश्वास नांगरे पाटील हे रोल मॉडेल आहेत.

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

विश्वास नांगरे पाटील यांनी आतापर्यंत कोणती पदं भूषवली?

लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
मुंबई पोलीसदल उपायुक्त
ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
अप्पर(अतिरिक्त ) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र
पोलीस आयुक्त - नाशिक

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

loading image