Post Covid OPD सुरू होणार कधी? गरजू रुग्‍णांचे होताहेत हाल

post covid clinic
post covid clinicesakal

नाशिक : कोरोना महामारीवर (Corona Virus) यशस्‍वीरीत्‍या मात केलेल्‍या रुग्‍णांमध्ये नंतरच्‍या कालावधीत विविध आरोग्‍यविषयक समस्‍या बघायला मिळत आहेत. अशा रुग्‍णांना वैद्यकीयसेवा देण्यासाठी जिल्‍हास्‍तरावर शहरी व ग्रामीण भागातही कोविडपश्चात बाह्यरुग्‍ण विभाग सुरू केला होता. मात्र, कोरोना महामारीच्‍या दुसऱ्या लाटेत आरोग्‍य यंत्रणेवर ताण आल्‍याने हा अभिनव उपक्रम खंडित झाला होता. यानंतर मोठ्या संख्येने नागरिक बाधित झालेले असताना, खऱ्या अर्थाने त्‍यांना आता आरोग्‍यविषयक मार्गदर्शनाची आवश्‍यकता आहे. त्‍यामूळे यापूर्वी कार्यरत असलेले पोस्‍ट कोवि‍ड ओपीडी (Post Covid OPD) पुन्‍हा कधी सुरू होणार, याकडे या रुग्‍णांचे लक्ष लागून आहे. विशेषतः आर्थिकदृष्या दुर्बल घटकांना मोठी आस लागून आहे.

उपक्रम पुन्‍हा सुरू होण्याची प्रतीक्षा

कोरोना आजार औषधोपचाराने बरा होत असला, तरी काही रुग्‍णांना कोरोनामुक्‍त झाल्‍यानंतरही आरोग्‍यविषयक समस्‍यांना सामोरे जावे लागत आहे. अशात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्‍तरावर पोस्‍ट कोवि‍ड सेंटरच्‍या माध्यमातून कोरोनामुक्‍त रुग्‍णांना आरोग्‍यविषयक सल्‍ला दिला जातो आहे. या धर्तीवर नाशिक जिल्‍हास्‍तरावर कोरोनापश्‍चात बाह्यरुग्‍ण विभाग (Post Covid OPD) सुरू केली होती. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्‍या सूचनेनुसार कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेनंतर ही सुविधा उपलब्‍ध करून दिली होती. याअंतर्गत शहरात, तसेच ग्रामीण रुग्‍णालयांमध्येही बाह्यरुग्‍ण विभागाच्‍या माध्यमातून कोरोनामुक्‍त रुग्‍णांच्‍या आरोग्‍यविषयक तक्रारींवर उपचार व मार्गदर्शन केले जात होते. या दरम्‍यान कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत आरोग्‍य यंत्रणेवर ताण आल्‍याने या उपक्रमात खंड पडला. सध्या परिस्‍थिती पूर्वपदावर आली असली तरी दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. या रुग्‍णांमध्ये कोरोनापश्‍चात समस्‍या आता डोके वर काढू लागल्‍या आहेत. त्‍यामुळे त्‍यांना वैद्यकीय सल्ल्‍याची आवश्‍यकता निर्माण झालेली असताना उपक्रम पुन्‍हा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.

post covid clinic
35 बँकांचे पैसे ग्राहकांना मिळणार घरपोच! 'या' मिळणार सुविधा

पाचशेहून अधिक रुग्‍णांची दैनंदिन व्‍हायची तपासणी

कोविडपश्‍चात बाह्यरुग्‍ण विभागामार्फत जिल्‍हाभरात रुग्‍ण तपासणी केली जायची. मार्च महिन्‍यापासून उपक्रम सुरू असेपर्यंत दररोज सरासरी पाचशे रुग्‍ण या सुविधेअंतर्गत तपासणी करत होते. जिल्‍हा रुग्‍णालयातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन अहवालानुसार ८ एप्रिलनंतर बाह्यरुग्‍ण विभाग तात्‍पुरता बंद करण्यात आला होता. यादिवशी ५६९ रुग्‍णांची तपासणी करण्यात आली होती. मात्र त्‍यानंतर आत्तापर्यंत उपक्रम बंद असल्‍याने रुग्‍ण तपासणी होऊ शकलेली नाही.

उपचाराचा आर्थिक भार सोसेना

यापूर्वीच कोरोनावर उपचारासाठी आलेल्‍या खर्चाने सर्वसामान्‍य बेजार झालेले आहेत. अशात कोरोनापश्‍चात उद्‌भवणाऱ्या आजारांकरिता येणाऱ्या खर्चाचा भार अनेकांना सोसेना झाला आहे. त्‍यामुळे शासकीय पातळीवर कोरोनापश्‍चात बाह्यरुग्‍ण तपासणीची सुविधा पुन्‍हा सुरू होण्याची अपेक्षा व्‍यक्‍त होते आहे.

post covid clinic
OBC Reservation : छगन भुजबळ घेणार कपिल सिब्बल यांची भेट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com