Nashik Accident News : कसारा घाटात बटाट्याचा ट्रक उलटला; दोघांना बाहेर काढण्यात यश | potato truck overturned in Kasara Ghat nashik accident news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Disaster team and highway security police team extricating the driver and assistant trapped under the overturned truck in the ghat

Nashik Accident News : कसारा घाटात बटाट्याचा ट्रक उलटला; दोघांना बाहेर काढण्यात यश

Nashik News : नाशिकहून मुंबईकडे बटाट्याची पोती घेऊन जाणारा ट्रक नवीन कसारा घाटात मंगळवारी (ता.३०) पहाटे चारच्या सुमारास उलटला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक घाटातील रस्त्याच्या कडेला उलटला.

यात चालकासह सहाय्यक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना आपत्ती निवारण पथकाने बाहरे काढले. (potato truck overturned in Kasara Ghat nashik accident news)

मुंबईला बटाट्याची पोती घेऊन जाणारा ट्रक (यूपी ८३, एटी२३५५) नवीन घाटात मध्यभागी आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. दोघे वाहनाखाली आडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन टिमला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीने सुमारे तीन तासाच्या अथक प्रयत्नाने चालक व सहाय्यकांना बाहेर काढले. जखमींना तातडीने नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या मोफत रूग्णवाहिकेतून इगतपुरी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या अपघातात गंभीर जखमी झालेला चालक रवी यादव (३५, रा. बदलपूर, उत्तरप्रदेश) व तीन तासांपासून अडकलेला चालक सहाय्यक जखमी रवीसिंग यादव (२६, रा. बघेरपूर करेल) यासही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आपत्ती व्यवस्थापन पथकाचे गणेश शिंदे, शाम धुमाळ, देवा वाघ, बाळू मागे, दत्ता वाताडे व बिवलवाडीतील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.

यात महामार्ग पोलिस अधिकारी अमोल वालझडे, लक्ष्मण वाघ, गणेश शिंदे, रूपेश भवारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस कर्मचारी दिंडे, युनूस तडवी, विनोद खादे, रूग्णवाहिका चालक कैलास गतीर यांनी मदतकार्य केले.

अपघातग्रस्त ट्रकमधील बटाट्याच्या गोण्या (बटाटा) ट्रकमधून आपत्ती निवारण पथकाने आधी बाहेर काढल्या. त्यानंतर क्रेनच्या मदतीने ट्रकवर उचलून खाली दाबलेल्या चालकास सुखरूप बाहेर काढले

टॅग्स :Nashikaccident case