esakal | ऐन सणाच्या दिवशी मालेगावची बत्ती गूल; नागरिकांत संताप
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon Power cut

ऐन सणाच्या दिवशी मालेगावची बत्ती गूल; नागरिकांत संताप

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील अपर जिल्हाधिकारी कार्यालयापाठीमागील सर्वात मध्यवर्ती भाग असलेल्या टिळकनगर, मोहन सिनेमागृह, हिरेवाडी, वर्धमाननगर नजीकचा परिसरात सोमवारी (ता. ६) दिवसभर वीजपुरवठा खंडीत होता. सणासुदीच्या दिवशी वीजेच्या झालेल्या या खेळखंडोब्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट होती.

सणाचे दळण, वाटन यामुळे बंद झाले होते. संपूर्ण दिवस पुरवठा खंडीत झाल्याने, इनर्व्हटर, मोबाईल देखील बंद पडले होते. परिसरातील रुग्णालय व अन्य आस्थापनांचे कामकाज विस्कळीत झाले होते. खासगी वीज कंपनी असलेल्या मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेडच्या कामकाजाबद्दल या भागातील रहिवाशी शिव्यांची लाखोली वाहत होते. सकाळी वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर किमान दोन तास दुर्लक्ष करण्यात आले. त्यानंतर नेमका पुरवठा का खंडीत झाला, याची शोधाशोध सुरु झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांना फॉल्ट सापडेना. या काळात परिसरातील रहिवासी वीज कंपनीच्या कार्यालयात दुरध्वनी लावून त्रस्त झाले होते.

अखेरीस ट्रान्स्फार्मर नादुरुस्त झाल्याची उपरती झाली. यानंतर सायंकाळी ट्रान्सफार्मर दुरुस्ती व बदलासाठी हालचाली सुरु झाल्या. रात्री उशिरापर्यंत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. मोहन सिनेमागृह ते वर्धमाननगर परिसरातील रहिवाशांचा सण अंधारातच साजरा झाला. खासगी कंपनी वीजबील वसुलीसाठी ज्या पद्धतीने कार्यतत्परता दाखविते त्याच पध्दतीने दुरूस्तीसाठी आगामी काळात कार्यतत्परता न दाखविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील रहिवाशांनी दिला आहे.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

loading image
go to top