श्वासाचा मार्ग प्राणायामामुळे शुद्ध! कोरोना झालेल्या रुग्णांना होतोय फायदा

शरीरातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी मदत
pranayam
pranayamesakal

नाशिक : कोरोनाकाळात (corona patient) शरीर निरोगी ठेवायचे असल्यास योगा प्राणायाम (Pranayama) फायदेशीर ठरत आहे. श्वासाचा मार्ग शुद्ध कसा राहील, यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे असून ते साध्य करण्यासाठी कोरोनाकाळात (benefits) योगा प्राणायमला लोकांनी जास्तीत जास्त करणे आवश्यक आहे. बाहेर फिरायला परवानगी नसल्याने घरातच सूक्ष्म व्यायाम, प्राणायाम केल्यास शरीरातील ऑक्सिजन (oxygen) वाढविण्यासाठी मदत ठरू शकते. दरम्यान, नाशिकमध्ये ऑनलाइन योगा, प्राणायाम क्लासेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. (Pranayama benefits corona patients)

कोरोना झालेल्या रुग्णांना प्राणायाममुळे होतोय फायदा

दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या शहरात झपाट्याने वाढत आहे. कोरोना झाल्यानंतर प्राणायामचा श्वसन प्रक्रिया, ऑक्सिजन, फुफ्फुस च्या समस्यांवर मात करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरत आहे. प्राणायाममध्ये कपालभारती, अनुलोम-विलोम, जलश्वसन भस्रिका प्राणायाम, काही सूक्ष्म योगाने श्वसनाला फायदेशीर ठरत आहे. कोरोनामध्ये मानसिक मनःशक्ती, आत्मिकशक्ती वाढायला मदत होते. योगातून गैरसमजातून आजाराबद्दल भीती असते, ती दूर होण्यास मदत होते. लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. त्या भीतीमुळे लोकांमधील त्रास वाढत आहे. त्याच्यावर प्रतिकारशक्ती शक्ती कशी वाढेल यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही सहजपणे प्राणायाम करू शकतो. फक्‍त त्याचे ज्ञान व प्रात्यक्षिक योग्य योगशिक्षकाच्या देखरेखीखाली करणे आवश्‍यक आहे. दैनंदिन जीवनात श्‍वासोश्‍वासावर नियंत्रण व त्याचे विविध प्राणायामाचे प्रकार नीट समजून घेणे कोरोनाकाळात सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकते.

pranayam
मे महिन्यासाठी स्वस्त धान्य! दुकानातून प्रतिकार्ड धान्य वितरण

कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्राणायाम, अनुलोम-विलोम आवश्यक आहे.यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीसह ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. नियमित प्राणायाम केल्यास मनातील भीती दूर होण्यास मदत होते.

- गिरीश गावंडे, योग प्रशिक्षक

pranayam
मी ‘ईडी’ आयुक्त बोलतोय....‘ईडी’च्या नावाचा गैरफायदा घेत मागितली खंडणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com