NMC News : महापालिकेकडून पावसाळा पूर्व कामांना गती; 323 मॅनहोलची दुरुस्ती | Pre monsoon work has been speeded up by nmc nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC News

NMC News : महापालिकेकडून पावसाळा पूर्व कामांना गती; 323 मॅनहोलची दुरुस्ती

Nashik News : पावसाला विलंब असला तरी महापालिकेच्या (NMC) वतीने पावसाळा पूर्व कामांना सुरवात झाली आहे.

पावसाळा पूर्व तयारीचा भाग म्हणून ३३७ किलोमीटरच्या भूमिगत गटारींची स्वच्छता करण्यात आली आहे तर सात हजार पैकी पाच हजार ०७१ चेंबर्सची सफाई करण्यात आली आहे. (Pre monsoon work has been speeded up by nmc nashik news)

१२८ किलोमीटर लांबीच्या गटारींची दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. अशी माहिती शहर अभियंता शिवकुमार वंजारी यांनी दिली.

यंदा पावसाला विलंब होणार असल्याने त्या अनुषंगाने पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. परंतु, बांधकाम व मलनिस्सारण विभागाने नियोजित वेळेत पावसाळा पूर्व कामांना सुरवात केली आहे. शहरात ४०० मॅनहोल असून त्यातील ३२३ मॅनहोलची दुरुस्ती झाली आहे. ७७ कामे प्रगतिपथावर आहेत.

सात हजार चेंबर्सपैकी पाच हजार ३७१ चेंबर्सची सफाई करण्यात आली आहे. एक हजार ६२९ चेंबर्सच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरात साडे चारशे किलोमीटर लांबीच्या भूमिगत गटारी आहेत. त्यातील ३३७ किलोमीटर गटारी स्वच्छ करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोनशे किलोमीटर लांबीच्या नादुरूस्त गटारींपैकी १२८ किलोमीटर लांबीच्या गटारी दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. ७२ किलोमीटर लांबींच्या गटारींची दुरुस्ती मे अखेर पर्यंत पूर्ण होतील. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व कामे पूर्ण केली जाणार असल्याचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी माहिती दिली.

पाणीपुरवठा विषयक पावसाळापूर्व कामांची स्थिती

कामांचा तपशील एकूण कामे केलेली कामे

व्हॉल्व चेंबर दुरुस्ती ९७ ६५

व्हॉल्व दुरुस्ती १९४ १६०

जलकुंभ स्वच्छता ११७ ९६

जलकुंभ परिसर स्वच्छता ११७ ७८

कामे ५२५ ३७२

टॅग्स :Nashikrainnmcmansoon