उन्हापासून बचावासाठी स्कार्पला पसंती; रूमाल, गमजे खरेदीला प्राधान्य

Cotton cloth
Cotton clothesakal

खामखेडा (जि. नाशिक) : मार्च महिन्याच्या सुरवातीपासून दररोज तापमानात वाढ होत आहे. अवकाळी पावसानंतर तापमान कमी होण्याचे चित्रच नाही. यावर्षी कसमादेच्या पाऱ्याने मार्चमध्येच चाळीशी गाठली आहे. त्यामुळे नागरिक वाढत्या उन्हा‍पासून बचाव करण्यासाठी स्टोन, रूमाल, गमजे आणि स्कार्प खरेदीला प्राधान्य देत असून, या वस्तूंची विक्री वाढली आहे.

मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात. सध्या कसमादे परिसरातील तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. या महिन्यात मुख्यतः ताप, सर्दी, डोकेदुखी अशा विविध आजारांचा महिला, लहान मुले, युवक व नागरिकांना सामना करावा लागतो. या वाढत्या तापमानाचे चटके बसू लागल्याने त्यापासून बचाव करण्यासाठी स्टोन, रूमाल, उपरणे, पांढऱ्या कापडाचा वापर वाढू लागला आहे. स्टोनला मुलींकडून मोठी मागणी आहे. देवळा, सटाणा, कळवण, मालेगाव शहरातून दररोज मोठ्या प्रमाणावर या वस्तू विक्रीसाठी येत आहे.

Cotton cloth
तणाव कमी करण्यासाठी ४ दिवसांचा आठवडा; ६० टक्के नागरिकांची पसंती

रूमाल, टोपी, गमजा, स्टोन, स्कार्पची मुंबई, सुरत, उस्मानाबाद आणि इंदूर शहरातून आवक होते. तर उपरणे, मालेगाव, येवला व मुंबई या ठिकाणाहून आवक होते. पुढील काळात तापमान वाढणार असल्यामुळे या वस्तूंचे दर वाढणार असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

हातरूमालही खातोय भाव

वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी युवक टोपीपेक्षा हातरूमालाला अधिक पसंती दाखवतात. कारण, तापमान कमी झाल्यानंतर रूमाल खिशामध्ये ठेवता येत असल्यामुळे टोपीपेक्षा रूमालाला युवकांतून मागणी वाढली असल्याचे विक्रेते सांगतात.

Cotton cloth
वजन कमी करा अन् बोनस मिळवा; कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी खास ऑफर

लहान मुलांच्या टोपीला मागणी

वाढत्या तापमानापासून लहान मुलांचा बचाव करण्यासाठी पालक सरसावले आहेत. उन्हाळा म्हटले की लहान मुले टोपीसाठी आई- वडिलांकडे हट्ट धरतात. दिवसभरात साधारणत: ३०० ते ४०० टोप्यांची विक्री होत आहे. वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी महिला स्कार्फला अधिक पसंती देतात. स्कार्फ खरेदीसाठी मुलींपेक्षा महिलांची मागणी जास्त असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com