Nashik News : जगात येण्यापूर्वीच बालकाचा आईसह मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death pregnant mother

Nashik News : जगात येण्यापूर्वीच बालकाचा आईसह मृत्यू

जुने नाशिक : जगात येण्यापूर्वीच बालकाचा आईसह मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता.२३) घडली. (pregnant woman dies due to Difficulty breathing nashik news)

भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वनिता कुंडलिक रणशूर (वय.३१, रा. टाकळी रोड, काठेगल्ली) या गर्भवती होत्या.

त्यांना श्‍वासोश्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पती कुंडलिक रणशूर यांनी गुरुवार (ता.२३) रोजी सकाळी सहा वाजता डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

सकाळी १० वाजून सात मिनिटास डॉ. प्रवीण जाधव यांनी तपासून मृत घोषित केले. डॉ. महेश सोनवणे यांनी दिलेल्या माहितीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.