Bazar Samiti Election : सटाणा, नामपूर बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीचा बिगूल

Bazar Samiti Election
Bazar Samiti Electionesakal

Nashik News : बागलाण तालुक्यातील सटाणा व नामपूर या दोन्ही मातब्बर बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकांचा बिगूल वाजला असून ३१ मे २०२३ पर्यंत बाजार समिती निवडणूक करिता ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटी सदस्यांची मतदार यादी सादर करण्याचे शासन आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

( preparation for Satana Nampur Bazar samiti Election started nashik news )

याच दरम्यान दोन्हीही बाजार समित्यांच्या विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढ मिळविण्याच्या राजकीय हालचाली देखील गतिमान झाल्या आहेत.

राज्यातील एक जानेवारी ते ३१ मे २०२३ या कालावधीतील ज्या बाजार समितीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपत आहे.

या बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियपन) अधिनियम, १९६३, त्याखालील नियम, १९६७ अन्वये निवडणुकीस पात्र ठरणाऱ्या बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bazar Samiti Election
Pachora Bazar Samiti : पाचोऱ्यात सभापतिपदासाठी हालचालींना वेग; राजकीय वर्तुळाचे लक्ष

त्याअनुषंगाने सटाणा व नामपूर बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत सदस्यांची सूची महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समित्या (समितीची निवडणूक) नियम, २०१७ व व सुधारित नियम, २०२० मधील नमुना ४ अ मध्ये तयार करून सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, सटाणा यांचे कार्यालयामार्फत ३१ मे अखेर या कार्यालयास दोन प्रतीत सादर करण्याचे लेखी आदेश बुधवारी (ता.१७) गटविकास अधिकारी व सहाय्यक निबंधक यांना प्राप्त झाले आहे.

यात बाजार समिती निवडणूक करिता ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सेवा सोसायटी सदस्यांची मतदार यादी सादर करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे.

दरम्यान नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ देऊ नये यासाठी त्या बाजार समिती कार्यक्षेत्रातील राजकीय शक्तींनी कंबर कसली आहे.

तर सर्वपक्षीय संचालक असलेल्या सटाणा बाजार समिती संचालक मंडळाने मुदतवाढ मिळण्याच्या छुप्या राजकीय हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे.

Bazar Samiti Election
Sinnar Bazar Samiti : सभापती निवडीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त; संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com