Nashik Crime News : पैसे पडल्याची बतावणी करून पावणे तीन लाखांची रोकड लंपास

crime news
crime news esakal

नाशिक : बोधले नगर येथील एसबीआय बँकेतून पावणेतीन लाखांची रोकड काढून सॅकमध्ये ठेवली आणि पार्किंगमधील मोपेड जवळ आलेल्या वृद्धाला संशयिताने खाली नोटा पडल्याचे सांगून मोपेडला अडकविलेल्या सॅकमधून पावणे तीन लाखांची रोकड भामट्यांनी लंपास केल्याचा प्रकार घडला.

घटनेची माहिती मिळताच गुन्हेशोध पथकाने बँकेबाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यानुसार संशयिताचा शोध घेतला जात आहे. (Pretending to have lost money stolen three lakh cash at bodhale nagar sbi bank Nashik Crime News)

६३ वर्षीय अशोक तोताराम पाटील (रा. ओमकार प्लाझा, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, ते त्यांच्या एका मित्रासमवेत बोधलेनगर येथील एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी आले होते. २ लाख ७५ हजारांची रोकड काढून ती रक्कम त्यांनी सॅकमध्ये ठेवले आणि दोघेही बँकेच्या बाहेर पडले.

बँकेच्या समोर पार्क केलेल्या त्यांच्या जुपिटर मोपेडच्या हुकाला त्यांनी सॅक अडकविली. पाटील यांचा मित्र मोपेड चालविण्यासाठी बसले. त्याचवेळी एक संशयित त्यांच्याजवळ आला आणि त्याने ‘तुमचे पैसे खाली पडले’ असे सांगितले.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

crime news
Jalgaon Crime News: घराचे दार उघडून 70 हजार लंपास

जमिनीवर १०,२० च्या नोटा पडलेल्या होत्या. त्या पाहून मोपेडवरील दोघेही उतरले आणि नोटा घेण्यासाठी खाली वाकले. तेवढ्या वेळेत संशयिताने हुकाला अडकविलेल्या सॅकमधून पावणे तीन लाखांची रोकड लंपास केली.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेची माहिती मिळताच गुन्हेशोध पथक घटनास्थळी पोहोचली. वृद्ध पाटील यांनी वर्णन केल्याप्रमाणे संशयितांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच, बँकेच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

crime news
Jalgaon Crime News: खिडकी तोडून चोरट्यांचा घरात प्रवेश अन् कपाट तोडून दागिने लंपास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com