esakal | ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटरची किंमत भिडली गगनाला; पुरवठा व्‍यवस्‍था प्रभावित
sakal

बोलून बातमी शोधा

oxygen contraser

ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटरची किंमत भिडली गगनाला; पुरवठा व्‍यवस्‍था प्रभावित

sakal_logo
By
अरूण मलानी

नाशिक : ऑक्सिजन टंचाईवर उपाय म्‍हणून ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटरचा पर्याय अवलंबला जातो आहे. परंतु अचानकपणे मागणीत प्रचंड वाढ झाल्‍याने पुरवठा व्‍यवस्‍था प्रभावित झाली आहे. यातून पूर्वी सुमारे तीस ते पस्‍तीस हजारांत मिळणारे ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटर सध्या सत्तर ते पंचाहत्तर हजारांना मिळत आहे. फ्लो-मीटरची मागणी दुप्पटीने वाढली आहे. यामुळे रुग्‍णाच्‍या नातेवाइकांना या उपकरणांसाठी खिसा हलका करावा लागत आहे.

फ्लो- मीटरची मागणीही दुप्पट, पुरवठा कमी झाल्‍याने किमतीत वाढ

कोरोना बाधिताना रुग्‍णालयात खाटा उपलब्‍ध होत नसल्‍याने डॉक्‍टरांच्‍या सल्‍यानंतर ऑक्सिजन कॉन्‍सट्रेटरचा आधार घेतला जात आहे. अचानक मागणीत वाढ झाल्‍याने ऑक्सिजन कॉन्‍सिट्रेटरच्‍या किमती गगनाला भिडल्‍या आहेत. पन्नास ते पंचाहत्तर हजार रुपयांना हे मशीन विक्री केले जाते आहे. काही ठिकाणी भाडे तत्त्वावर मशीन उपलब्‍ध होते आहे. ऑक्सिजन सिलिंडरकरिता लागणारे फ्लो-मीटरलाही मोठी मागणी वाढली आहे. पूर्वी सुमारे एक हजार ते बाराशे रुपयांना मिळणारे फ्लोमीटर सध्या तीन हजार ते पस्‍तीसशे रुपयांना विक्री होत आहे.

पैसे मोजूनही माल भेटणे मुश्‍कील

यासंदर्भात विक्रेत्‍यांशी संपर्क साधला असता, पुरवठा अत्‍यंत कमी होत असल्‍याचे सांगण्यात आले. जादाचे पैसे मोजूनही माल भेटेलच का, याची शाश्‍वती नसल्‍यानेही नमूद केले. येत्‍या काही दिवसांत पुन्‍हा परिस्थिती सुरळीत होईल, असा अंदाजही व्‍यक्‍त करण्यात आला.

loading image