
Vegetable Rates Fall : पालेभाज्यांचे भाव गडगडले; कोथिंबीर फक्त एक रुपया!
पंचवटी (जि. नाशिक) : पालेभाज्यांची आवक प्रचंड वाढल्यामुळे मागणी घटली आहे. नाशिक बाजार समितीच्या आवारात कोथिंबीर, मेथी, शेपू , कांदापात या पालेभाज्यांची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे.
बाजार समितीमध्ये विक्रीस आणलेल्या कोथिंबीर जुडीला १ रुपया भाव मिळाल्याने ती परत नेणे परवडत नसल्याने शुक्रवारी (ता. २४) रात्री रस्त्यावरील लोकांना शेतकऱ्यांना फुकट वाटप केली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
नाशिक बाजार समितीत रोज पालेभाज्यांच्या लिलावासाठी सध्या पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या लिलावासाठी मांडण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. फेब्रुवारी महिन्यात वाढलेले ऊन बघता पालेभाज्यांची आवक कमी असे वाटले होते . मात्र , थंडीत शेतकऱ्यांनी पालेभाज्यांची लागवड अधिक असते. त्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आणल्याने त्यांच्या दरात घसरण झाली.
झालेली आवक व मिळालेला दर
कोथिंबीर गावठी आवक एक लाख दहा हजार जुडी बाजार भाव किमान ५०० रुपये ते कमाल १७५० रुपये शेकडा, चायना कोथिंबीर आवक एक लाख जुडी बाजारभाव किमान ४०० रुपये ते १५३५ रुपये शेकडा, मेथी आवक चोवीस हजार जुडी बाजारभाव किमान २०० रुपये ते कमाल १००० रुपये शेकडा, शेपू आवक १५००० जुडी बाजार भाव ६०० रुपये कमाल ११३५ रुपये शेकडा, कांदापात आवक २५००० जुडी बाजारभाव किमान २०० रुपये कमाल १५०१ रुपये शेकडा मिळाला.