esakal | भाव तेजीत आल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब; आवक कमी झाल्याने वाढले दर
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables

भाव तेजीत आल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब

sakal_logo
By
सकाळ वृत्त सेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे शेतातील भाजीपाला पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने सध्या बाजारातील भाजीची आवक निम्याने कमी झालेली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव दुप्पटीने वाढल्याने सर्वसामान्यांच्या ताटातून पालेभाज्या गायब झाल्या आहे. वांगी, शिमला मिरची, पालक, भेंडीचे दर आकाशाला भिडले आहेत. प्रतिकिलो दर साठ ते शंभर रूपये असे वाढले आहेत.

पुढचे काही दिवस भाव तेजीतच

निफाड तालुक्यात स्थानिक व बाहेरील भाज्यांची आवक अतिशय कमी झालेली आहे. हॉटेल व रेस्टारंट सुरू झाले असून छोटे मोठे समारंभ सुरू झाले आहेत. भाज्याच्या मागणीत दुप्पटीने वाढल झालेली आहे. त्यातुलनेत आवक कमी असल्याने भावात वाढ झालेली आहे. नवीन पालेभाज्या येण्यास महिनाभराचा अवधी आहे. त्यामुळे पुढील काही दिवस चढ्याच दराने भाजी खरेदी करावी लागणार आहे. वांग्याच्या भावातील वाढ कायम आहे. कोथिंबीर, मेथी, भेंडीचे भाव वाढले आहेत. किरकोऱ बाजारात सर्वच भाज्या प्रतिकिलो ६० ते १०० रूपये झालेले आहेत.

हेही वाचा: ''अर्ध्या मंत्रिमंडळाला मराठा नको, तर अर्ध्यांना ओबीसी नको''

किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर प्रतिकिलो

वांगे-१००

गवार- ५०

मेथी -४०

कोबी गडा ४०

भेंडी-५०

शिमला मिरची-६०

कारले -५०

पालक जुडी-३०

गवार- ६०

हेही वाचा: नाशिक बाजार समितीत शुकशुकाट, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

loading image
go to top