"खाजगी डॉक्टरांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची, त्यांनाही विनामुल्य प्रोटेक्शन किट पुरवावा"- चेतनसिंह पवार

doctors.jpg
doctors.jpg

नाशिक : खाजगी डॉक्टरांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे सरकारने जर याबाबत योग्य ती दखल घेऊन खाजगी डॉक्टरांना शासनाच्या वतीने विनामुल्य प्रोटेक्शन किट पुरविण्याची सोय केली तर हे डॉक्टर्स राज्यातील विशेषत:आदिवासी व ग्रामीण भागात रुग्णांची सेवा बिनधास्तपणे करु शकतील असे निवेदन महाराष्ट्र काॅंग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रदेश सरचिटणीस चेतनसिंह पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सोशल मिडीयाव्दारे निवेदन सुपुर्द केले.

निवेदनात म्हटलयं की..

या निवेदनात चेतनसिंह पवार यांनी म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यातील शहर/ग्रामीण भागामध्ये बहुतांशी खाजगी दवाखाने कोरोना व्हायरसच्या भीतीने बंद करण्यात आले होते. परंतु सरकारच्या आदेशामुळे ते पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. याबाबत खाजगी डॉक्टरांशी चर्चा केली असता असे लक्षात आले की,कोरोना व्हायरस पसरु नये म्हणून तसेच प्रोटेक्शन किटच्या अभावी खाजगी डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. असे यावेळी चेतनसिंह पवार यांनी सांगितले.

खाजगी डॉक्टरांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची

देशाची राजधानी दिल्ली येथे मोहल्ला क्लिनिकमध्ये एक डाॅक्टर कोरोना बाधित आढळला. या प्रकारामुळे त्यांनी हाताळलेल्या बाह्यरुग्ण कक्षातील मागील १० दिवसापासुन तेथील रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. कारण नकळत जरी एखादा डॉक्टर दुदैवाने कोरोना व्हायरस बाधीत झाला तर तो शेकडो-हजारो रुग्णांना बाधीत करु शकतो, त्यामुळे खाजगी डॉक्टरांची सुरक्षाही तेवढीच महत्त्वाची असते. त्यामुळे सरकारने जर याबाबत योग्य ती दखल घेऊन खाजगी डॉक्टरांना शासनाच्या वतीने विनामुल्य प्रोटेक्शन किट पुरविण्याची सोय केली तर हे डॉक्टर राज्यातील विशेषत:आदिवासी व ग्रामीण भागात रुग्णांची सेवा बिनधास्तपणे करु शकतील असे या निवेदनात चेतनसिंह पवार यांनी मांडले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com