Nashik News : भगवान बुद्धाच्या 100 मूर्तींची शहरातून मिरवणूक | Procession of 100 idols of Lord Buddha through city in panchavati Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

The idol of Lord Buddha is said to be a participant in the procession

Nashik News : भगवान बुद्धाच्या 100 मूर्तींची शहरातून मिरवणूक

Nashik News : भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आणि बीएमए ग्रुपतर्फे जिल्ह्यात मंगळवारी (ता. २) भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त नाशिक शहरातून सांयकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील १०० गावांमधील ५०० श्रामणेर आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते, तसेच यानिमित्त रात्री गोल्फ क्लब येथे महाबौध्द धम्म परिषद, प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम झाला. (Procession of 100 idols of Lord Buddha through city in panchavati Nashik News)

शहरातून १०० बुद्ध मूर्तींची रंगीबेरंगी फुलांनी व निळ्या झेंड्यांनी सजवलेल्या छोटा हत्ती वाहन म्हणजेच १०० रथांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. सांयकाळी ५ वाजता तपोवनातून भगवान गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात या मिरवणुकीस प्रारंभ झाला.

ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तसेच अनेक भीमगीते आणि बौद्ध गीते यांनी परिसर व अनेक चौक दणाणून गेले होते. या मिरवणुकीत यात भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न,

भदंत सुगत, भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदींसह पंचशील ध्वजाचे प्रतीक असलेल्या छत्री हाती घेऊन शेकडो श्रामणेर आणि पांढरे वस्त्र परिधान केलेले हजारो स्त्री - पुरुष, समाज बांधव सहभागी झाले होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

गोल्फ क्लब येथे मिरवणुकीचे रूपांतर श्रामणेर शिबिर तथा प्रबोधन सभेत झाले. यावेळी महाबौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. यात भदंत ज्ञानज्योती महाथेरो, भदंत बोधीपाल, भदंत धम्मरत्न, भदंत सुगत,

भदंत आर्यनाग, भदंत शीलरत्न आदींनी मार्गदर्शन केले, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक व बीएमए ग्रुपचे संस्थापक मोहन आढांगळे यांनी दिली. रात्री उशिरा या कार्यक्रमानंतर बौद्ध व भीम गीतांचा कार्यक्रम झाला.

याप्रसंगी प्रदीप पोळ, सचिन वाघ, राहुल बच्छाव, डी. एम. वाकळे, के. के. बच्छाव, वाय. डी. लोखंडे, संजय भरीत, आर. आर. जगताप, पी. डी. खरे, बाळासाहेब शिरसाट, आर. आर. जगताप, अरुण काशीद, नितीन मोरे, बबन काळे, आर. एस. भामरे, गुणवंत वाघ, संदेश पगारे, खुशाल जाधव, अशोक गांगुर्डे, सोमनाथ शार्दूल, शिवाजी काळे, अजिंक्य जाधव आदी उपस्थित होते.