प्रोजेक्‍ट दुर्गा : सकारात्‍मक दृष्टिकोनाच्या जोरावर 'ती'ची कर्करोगावर मात

Breast Cancer Survivor News
Breast Cancer Survivor Newsesakal

अगदी सामान्‍य आयुष्य जगताना एकेदिवशी स्‍तनात छोटीशी गाठ असल्‍याचे निदर्शनात आले. तपासणीनंतर स्‍तनाचा कर्करोग असल्‍याचे निदान झाले. या आव्‍हानात्‍मक प्रसंगात कुटुंबातील प्रत्‍येक सदस्‍याने दिलेले पाठबळ व सकारात्‍मक दृष्टिकोन याच्‍या जोरावर अरुणा रत्‍नपारखी यांनी कर्करोगावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. गेल्‍या आठ वर्षांपासून ते पुन्‍हा सामान्‍य जीवन जगताय.

ऑगस्‍ट २०१४ मध्ये सौ. रत्‍नपारखी यांना स्‍तनांच्‍या कर्करोगाचे निदान झाले. त्‍यांच्‍यासह सर्व कुटुंबीय सुरवातीला काहीसे चिंतित झाले होते. तिसऱ्या स्‍तरावर कर्करोग पोचलेला असताना, कुटुंबीयांनी अनेक डॉक्‍टरांची भेट घेत सल्‍ला घेतला. पण कर्करोग तज्‍ज्ञ डॉ. शैलेश बोंदार्डे यांच्‍याकडे उपचार घेण्याचे निश्‍चित केले. (Project Durga Aruna Ratnaparkhi overcomes cancer with positive attitude living normal life for 8 years nashik Latest Marathi News)

Breast Cancer Survivor News
Navratrotsav 2022 : NMC महिला कर्मचाऱ्यांसाठी स्पर्धा; 105 महिलांचा सहभाग

त्‍यांनी समुपदेशन करत सौ. रत्‍नपारखी व कुटुंबीयांना धीर देत आत्‍मविश्‍वास वाढविला. उपचार सुरू करताना केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रियादेखील करण्यात आली. पुढे नियमित तपासणी सुरू ठेवताना सौ. रत्‍नपारखी यांनी कर्करोगाचा यशस्‍वी पराभव केला. या कठीण प्रसंगात पती दीपक रत्‍नपारखी, मुलगा मयुरेश रत्‍नपारखी यांच्‍यासह दीर, जाऊ, नणंद, सून, मुलगी, जावई यांची भक्‍कम साथ लाभल्‍याचे त्‍या आवर्जून सांगतात.

तर डॉ. बोंदार्डे यांनी मनोबल कमी न होऊ देता नेहमीच प्रोत्‍साहन दिले. त्‍याचा सकारात्‍मक परिणाम झाल्‍याचेही सौ. रत्‍नपारखी यांनी सांगितले. उपचारादरम्‍यान शासकीय योजनेची मदत मिळाल्‍याने आर्थिक भार काहीसा कमी झाल्‍यानेदेखील दिलासा मिळाला. एकीकडे उपचार सुरू असताना दुसरीकडे पूजाविधीतून धार्मिकता जपताना स्वतःला व्‍यस्‍त ठेवले. नित्‍याच्‍या पूजेतून ऊर्जा मिळाल्‍याचा अनुभव सौ. रत्‍नपारखी सांगतात.

Breast Cancer Survivor News
‘Nirbhaya’ गस्त पथकांची करडी नजर; दिवस-रात्र महिला सुरक्षिततेसाठी गस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com