NMC Dog sterilization : श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद | provision of 1 crore for sterilization of dogs nmc nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sterilization of dogs

NMC Dog sterilization : श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद

NMC Dog sterilization : महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून श्वान निर्बीजीकरणासाठी प्रतिश्वान ९९८ रुपये असा दर निश्चित करण्यात आला असून पुढील एक वर्षात १० हजार २२ श्वान निर्बीजीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून महापालिका हद्दीतील भटक्या व मोकाट श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी २००७ पासून निर्बीजीकरण मोहीम राबविली जात आहे. पंधरा वर्षात एक लाखाहून अधिक श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले. (provision of 1 crore for sterilization of dogs nmc nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या वर्षीदेखील श्वान निर्बीजीकरण करण्याचा ठेका देण्यात आला आहे. मात्र यंदा प्रतिश्वान दर वाढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वी प्रतिश्वान निर्बीजीकरण करण्यासाठी ६५० रुपये असा दर निश्चित होता.

परंतु ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या निर्णयानुसार ३५ टक्के वाढ करण्यात आली आहे. आता प्रतिश्वान ९९८ रुपये इतका दर दिला जाणार आहे. महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरणासाठी फेरनिविदा काढण्यात आली.

एप्रिल २०२२ मध्ये ॲनिमल वेल्फेअर बोर्डाने १६०० रुपये बेस रेट निश्चित केला होता. त्यानुसार ९९८ रुपये हा बेस रेट निश्चित करण्यात आला. श्वान निर्बीजीकरण करण्यासाठी तीनदा निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांनी सांगितले.

टॅग्स :NashiknmcStray Dogs