Nashik News: रब्बीमध्ये 262 लाख टन गव्हाची 47 हजार कोटी रुपयांमध्ये खरेदी

wheat
wheat esakal

Nashik News : देशात हमी भावाने यंदाच्या रब्बीमध्ये २६२ लाख टन गव्हाची ४७ हजार कोटी रुपयांमध्ये खरेदी करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही खरेदी ७४ लाख टनाने अधिक आहे.

२१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांकडून हा गहू खरेदी करण्यात आला आहे. पंजाबमधून १२१.२७, मध्यप्रदेशातून ७०.९८, हरियानामधून ६३.१७ लाख टन गव्हाची खरेदी झाली आहे. (Purchase of 262 lakh tonnes of wheat in Rabi for Rs 47 thousand crores Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

wheat
Nashik News: ‘जलजीवन’ कामांबाबत तक्रारींचा पाढा; कोकाटेंकडूनही कामांबाबत तक्रारी

अवकाळी पावसाचा परिणाम गव्हावर झाल्याच्या अनुषंगाने गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांमध्ये केंद्र सरकारने शिथीलता दिली. गाव, पंचायतस्तरावर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. सहकारी संस्था, ग्रामपंचायती, अडते त्यांच्यामाध्यमातून खरेदी करत असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांना संलग्नतेची परवानगी देण्यात आली.

याशिवाय ३८५ लाख टन धानाची खरेदी करण्यात आली आहे. आणखी ११० लाख टन धानाची खरेदी शिल्लक आहे. खरीप २०२२-२३ मधील रब्बीच्या खरेदीमध्ये १०६ लाख टन खरेदीचा अंदाज आहे.

अशा तऱ्हेने गहू आणि धानाचा एकत्रित साठा ५७९ लाख टन इतका झाली आहे. देशाची अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी ही सुस्थिती तयार झाल्याचे केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

wheat
National Startup Award : राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार अर्जाच्या अंतिम मुदतीत 15 जूनपर्यंत वाढ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com