Nashik Crime: सप्तशृंग गडावर गर्दीमुळे पर्स, दागिने चोरटे सक्रीय; महिला पोलिसाने मिळवून दिली गहाळ झालेली चैन

Women Police Varsha Nikam while finding the missing gold chain and handing it over to women futures.
Women Police Varsha Nikam while finding the missing gold chain and handing it over to women futures.esakal

Nashik Crime : आद्य स्वयंभू शक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर उन्हाळी सुट्टीनिमित्त भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली असून, गर्दीचा फायदा घेत पॉकीट (पर्स), मनी-मंगळसुत्र चोरट्यांची टोळीही सक्रीय झाली आहे.

त्यामुळे भाविकामध्ये नाराजी पसरत असतानाच मंगळवारी (ता. ९) एका महिला भाविकाच्या गळ्यातून सोन्याची चैन गहाळ झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यावर महिला पोलिसांनी यशस्वी तपास करुन संबंधीत महिलेस चैन मिळवून दिली. (Purse jewelery thieves active at Saptshring Fort due to crowd Nashik Crime news)

चैत्रोत्सवाला येणे शक्य न झालेले भाविक सध्या सुटीच्या काळात गडावर येत आहेत. तसेच, सुट्यांमुळे पर्यटकांचीही गर्दी होत आहे. त्यातच जोरदार लग्नसराईमुळे विवाहीत जोडपे व नातेवाईक कुलदैवतेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गडावर येत आहेत.

त्यामुळे गडावर सध्या उन्हाळी यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले असून, चोरटेही सक्रीय झाले आहेत. त्यातून पकीटमारी व गळ्यातील अलंकार चोरीच्या घटना घडत आहेत. कळवण पोलिस ठाण्यांतर्गत नांदुरी व सप्तशृंगी गड येथे पोलिस चौकी आहे.

मात्र, मर्यादीत कर्मचारी संख्येमुळे दोन्ही ठिकाणी पोलीसांना कर्तव्य बजावताना दमछाक होते. त्याचाही फायदा चोरटे घेताना दिसतात. याबाबत भाविकांत नाराजी व्यक्त होत असल्याने कळवण पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Women Police Varsha Nikam while finding the missing gold chain and handing it over to women futures.
Nagpur Crime : आंतरधर्मीय लग्नानंतर पत्नीची हत्या करणाऱ्यास जन्मठेप

त्याचाच प्रत्यय मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील नंदिनी राहूल शिंदे या तरूणीला आला. आपल्या मामाच्या कुटुंबासोबत ती सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी आली असताना, रोपवे ट्रॉली परिसरात गळ्यातील सोन्याची चेन गहाळ झाल्याचे तिच्या लक्षात आले.

परिसरात तैनात असलेल्या महिला पोलीस वर्षा निकम यांच्याकडे तीने तक्रार केली. त्यानुसार निकम यांनी तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले व परिसरात शोध घेतला. त्यावेळी गहाळ झालेली साठ हजार रुपयांची सोन्याची चैन रोप-वेतील कोपऱ्यात आढळून आली. त्यांनी ही चेन नंदिनीची असल्याची खात्री पटवत तिला सुपूर्द केली.

Women Police Varsha Nikam while finding the missing gold chain and handing it over to women futures.
Crime News : मस्करीची कुस्करी! मित्राने गुदद्वारात हवा भरल्याने कामगाराचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com