Nashik News: रस्त्यावर खड्डा पडल्यास अधिकारी जबाबदार : रवींद्र चव्हाण | pwd Ravindra Chavan Officials responsible if pothole on road Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PWD News

Nashik News: रस्त्यावर खड्डा पडल्यास अधिकारी जबाबदार : रवींद्र चव्हाण

Nashik News : शहरी भागामध्ये पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडल्यानंतर मोठ्याप्रमाणात त्याची चर्चा होते. तशी चर्चा महामार्गावरील रस्त्यासंबंधी होत असते.

त्यामुळे खड्डा तातडीने भरण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे पोर्टल तयार करण्यात आले असून खड्डे बुजविण्यासाठी अकराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. (pwd Ravindra Chavan Officials responsible if pothole on road Nashik News)

नाशिक बांधकाम विभागाची बैठक श्री. चव्हाण यांच्या उपस्थितीत झाली. श्री. चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे यंदाच्या पावसाळ्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.

ते म्हणाले, की पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. कोकण विभागात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.

त्यादृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिक काळजी घेतली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात, नागरिकांच्या तक्रारी येतात. परंतु यंदा तक्रारी टाळण्यासाठी बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यासाठी एक नवीन पोर्टल तयार करण्यात आले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील खड्ड्यांचे छायाचित्र पोर्टलवर टाकल्यास सात दिवसांच्या आत ते खड्डे भरले जाणार आहेत.

काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज

भाजपच्या कार्यालयात श्री. चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढला जाईल.

तसेच काम न करणारे अधिकाऱ्यांना समज देऊन नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या सूचना देण्यात येतील. ठेकेदारांच्या काही अडचणी असतील, तर त्या प्रश्नावर तोडगा काढण्यात येईल.