मनमाड चौफुली येथे लॉजवर छापा; पीडित तरुणीसह 6 जण ताब्यात

raid on lodge
raid on lodgeesakal

मालेगाव (जि.नाशिक) : शहराजवळील सुयश व्यापारी संकुलातील अमर लॉजमध्ये देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याची माहिती शिवसेना कार्यकर्त्यांना (shivsena activists) मिळाली. किल्ला पोलिसांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने रविवारी (ता. २३) रात्री लॉजवर छापा (Raid on lodge) टाकला असता तीन पीडित तरुणींसह सहा जणांना ताब्यात घेत अटक केली.

मनमाड चौफुली येथे लॉजवर छापा

या बांगलादेशी पीडित तरुणींना देहविक्रयच्या व्यवसायासाठी येथे कायमस्वरूपी आणल्याचे समजते. या लॉजसह शहरातील काही भागात कुंटणखाने व वेश्‍याव्यवसाय बिनभोबाट सुरू आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत किल्ला पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते. यापूर्वी लॉजसंदर्भात तक्रारी आल्यानंतर दोन वेळा जुजबी कारवाई झाली. कारवाई होऊनही व्यवस्थापक व तेथील कर्मचाऱ्यांचा हा गोरखधंदा जोरात सुरू होता. उपअधीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ला पोलिसांनी कुंटणखान्यावर छापा टाकून ही कारवाई केली.

raid on lodge
स्थायी समितीवर सदस्य वाढीसाठी भाजपच्या हालचाली

देहविक्रय व्यवसाय करणाऱ्या पीडित तरुणीसह सहा जण ताब्यात

किल्ला पोलिस ठाण्यात लॉजचे व्यवस्थापक प्रशांत देवरे (रा. मालेगाव), योगेश वैद्य, महेंद्र जैन (दोघे रा. वडनेर-खाकुर्डी) व हसमतअली शेख (रा. मोदनीपूर) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित तरुणींची महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख रामा मिस्तरी, युवा सेनाप्रमुख विनोद वाघ, प्रमोद शुक्ला, नरेंद्र पवार व सहकाऱ्यांना मिळाली.

raid on lodge
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com