रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरण; ट्रॅव्हल संचालकासह एजंट अटकेत

रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांनी तजेंद्र सिंहकडून एक मोबाईल, पीडीएफ तिकीट जप्त केले.
Crime update
Crime updatesakal media

नाशिक : मध्य रेल्वेच्या नाशिक रोड रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) सिन्नर पोलिसांच्या मदतीने सिन्नरमधील ट्रॅव्हल्सचा संचालक व एजंटला रेल्वे तिकीट काळाबाजारप्रकरणी ताब्यात घेतले. त्यांना अटक करून संगणक, तिकिटे व अन्य साहित्य जप्त केले. त्यांना मनमाड न्यायालयात सादर करण्यात आले असता, त्यांची जामीनावर मुक्तता झाली.

आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक एन. व्ही. गुहिलोत यांनी दिलेली माहिती अशी, संशयित तजेंद्र सिंह (३२, रा. उज्ज्वलनगर, मुसळगाव एमआयडीसी) याचे मुसळगाव येथे गुरूकृपा मोबाईल शॉप आणि इलेक्ट्रिकल दुकान आहे. तो अवैध तिकीट विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक रवींद्र कुमार, सागर वर्मा यांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने तजेंद्र सिंहकडे चौकशी केली. त्याचा मोबाईल तपासला असता, रेल्वेची तीन तिकिटे मिळाली.

त्याने सांगितले की, गरजू प्रवाशांकडून प्रत्येकी अडीचशे रुपये जास्त घेऊन सिन्नरमधील विजय ट्रॅव्हलचा मालक विजय डांगरे याच्यातर्फे तिकीट बुक करतो. रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांनी तजेंद्र सिंहकडून एक मोबाईल, पीडीएफ तिकीट जप्त केले. विजय ट्रॅव्हल्समध्ये जाऊन चौकशी केली असता, डांगरेने हे आयडी आपले जुने असल्याचे सांगितले. डांगरेचा संगणक तपासला असता, बारा खासगी आयडी आणि ९८३६ रुपयांची तिकिटे, १८ हजार ५५० रुपये किमतीचे ११ वापरलेली तिकिटे मिळाली. त्याचा संगणक, सीपीयू, वही आदी पोलिसांनी जप्त केले. दोघांना नाशिक रोड रेल्वे स्थानकात आणून रेल्वे कायद्यातील कलम १४३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. प्रवाशांनी अधिकृत केंद्रातूनच तिकिटे घ्यावीत, असे आवाहन वरिष्ठ निरीक्षक गुहिलोत यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com