म्युकरमायकोसिस आजाराबाबत जनजागृती करा : कृषिमंत्री दादा भुसे

कोरोनानंतर पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस वेगाने वाढत आहे. शहरातही याचे रुग्ण आढळून आले.
dada bhuse on mucar mycosis
dada bhuse on mucar mycosise-sakal

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना संसर्गातून(Corona virus) बरे झालेल्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती(Immunity) घटल्यामुळे काही रुग्णांना म्युकरमायकोसिस(Mucor mycosis) या नवीन आजाराचा त्रास होत आहे. या आजाराची व्याप्ती लक्षात घेऊन शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत(MPJAY) त्याचा समावेश केला आहे. या आजारावरील उपचारासाठी कान, नाक, घसातज्ज्ञांची नेमणूक करून रुग्णांना दिलासा द्यावा. आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (ता.१४) येथे केले.(Raise awareness about mucomycosis)

आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान

कोरोनानंतर पोस्ट कोविड(Post covid) म्युकरमायकोसिस वेगाने वाढत आहे. शहरातही याचे रुग्ण आढळून आले. मंत्री भुसे म्हणाले, की कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला. तथापि, जिल्ह्यात पोस्ट कोविडनंतर म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान निर्माण झाले. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढले आहे. ज्यांना मधुमेहाचा त्रास, रोगप्रतिकारशक्ती कमी अशा रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक आहे. या आजाराची लक्षणे जाणवताच रुग्णांनी तत्काळ कान, नाक, घसा व नेत्रतज्ज्ञांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत. संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान बालकांना धोका संभवतो. यासाठी शहरातील बालरुग्णालयातही ऑक्सिजन बेड(Oxygen Bed), ऑक्सिजन कॉन्सेट्रेटरची(Oxygen concentrator) संख्या वाढवावी, असे आदेश देण्यात आले.

dada bhuse on mucar mycosis
एकेकाळी ज्या गावात कोरोनाचे थैमान; आज अख्खे 'गाव' कोरोनामुक्त!

आरोग्य यंत्रणा सज्ज

यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. उपमहापौर नीलेश आहेर, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, सामान्य रुग्णालयाचे डॉ. हितेश महाले, महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना ठाकरे आदी उपस्थित होते.

निकम यांनी सर्व खासगी डॉक्टरांनी सामाजिक दायित्वातून रुग्णसेवेत योगदान दिल्यास पोस्ट कोविड म्युकरमायकोसिस या आजारावर मात करणे शक्य आहे, असे सांगितले. मनोहर बच्छाव, विनोद वाघ, डॉ. जतीन कापडणीस, डॉ. अनिल मुळे, डॉ. रमेश चोपडे, डॉ. पीयूष रणभोर, डॉ. पुष्कर आहेर, डॉ. प्रशांत वाघ, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. दर्शन ठाकरे, डॉ. पंकज लोथे, डॉ. बोहरा, डॉ. बिऱ्हाडे, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. अभय पोतदार, डॉ. दीपक पवार, डॉ. धनश्री देवरे, डॉ. आफाक अन्सारी यांच्यासह शहरातील सर्व बालरोगतज्ज्ञ, कान, नाक व घसातज्ज्ञ उपस्थित होते.

dada bhuse on mucar mycosis
चिंचोलीचे जवान अमोल झाडेंना सिक्कीमध्ये वीरगती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com